आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Smart Tower Built For The Smart City; Information Will Be Given About Whether There Has Been Encroachment, How Is The Drainage System, How Are The Roads, If There Is Any Corruption

स्मार्ट सिटीसाठी बनवले स्मार्ट टाॅवर; अतिक्रमण झाले का, ड्रेनेज यंत्रणा कशी आहे, रस्ते कसे आहेत, करचोरी झाली नाही ना याची देणार माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : इंडिया मोबाइल काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी १५ पेक्षा जास्त देशांनी नवोन्मेषी प्रकल्प सादर केले. त्यात स्मार्ट सिटीजना एकाच ठिकाणाहून नियंत्रित करणारे देशात बनवलेले स्मार्ट टॉवर आणि ५ जीच्या स्पीडचा लाइव्ह डेमो प्रमुख आहेत. बंगळुरूच्या कोग्नो कंपनीने असे टॉवर तयार केले आहे, जे संपूर्ण शहराचे मॅपिंग करू शकते आणि शहरात ड्रेनेज यंत्रणा कशी आहे, रस्त्यांची स्थिती कशी आहे, वेस्ट डिस्पोजल व्यवस्थित होतेय की नाही, हिरवळ किती आहे, अतिक्रमण तर झाले नाही ना हे सांगू शकते. त्यात कुणी कर भरलेला नाही, कुणी रस्त्यावर वाहन पार्क केले आहे किंवा कोण नियमांचे पालन करत नाही असा लोकांचा डेटाही समाविष्ट असेल. त्यामुळे सरकारला शहरावर लक्ष ठेवणे आणि ते सुव्यवस्थित ठेवणे सोपे होईल. या टॉवरवर कॅमेरा, स्क्रीन, सौर पॅनल, वाय-फाय, ड्रोन लँडिंग आणि चार्जिंग पॉइंटसह अनेक तंत्रज्ञान सेट केले जाऊ शकतात. टॉवरवरच ड्रोनचा डेटाही गोळा करता येईल. नाशिक, हैदराबादसह ८ शहरांत हे टॉवर्स पथदर्शी प्रकल्पांतर्गत लावले आहेत. ही संकल्पना अगदी मोबाइल फोनसारखी आहे. एकदा फोन घेतल्यानंतर तुम्ही त्यात कितीही अॅप डाऊनलोड करू शकता. प्रत्येक अॅपसाठी तुम्हाला नवीन फोन घ्यावा लागत नाही. अशाच प्रकारे टॉवर्सही प्लॅटफॉर्मप्रमाणेे काम करतात. मोबाइल काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच ५ जीचा स्पीड दाखवण्यात आला. डेमोदरम्यान नेटवर्कचा स्पीड १.९१ जीबीपीएस राहिला. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये १ जीबीची फाइल डाऊनलोड करण्यासाठी १ सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. अॅरिक्सन आणि क्वॉलकॉमने हा डेमो दिला.

मूल किती वेळ गाढ झोपले हे तुम्हाला सांगणार स्मार्ट पाळणा
लहान मुलाला झोपवणे आणि रात्रभर हातात घेऊन जोजवणे आई-वडिलांसाठी थकवा आणणारे असते. स्मार्ट पाळणा मुलाचे डोळे उघडताच अलर्ट तर करतोच, शिवाय लगेचच पाळणा हलवण्यास सुरुवात करतो. मुलाच्या झोपेची आणि मूल किती वेळ रात्री गाढ झोपते याची माहितीही तो देतो. आई-वडील पाळण्याची फ्रिक्वेन्सी आपल्या हिशेबाने सेट करू शकतात. त्याशिवाय पाळण्यात लावलेला स्पीकर मुलासाठी संगीत ऐकवतो. त्यात आई-वडील आपल्या आवाजातही गाणे रेकॉर्ड करू शकतात. या स्मार्ट पाळण्याची किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे.
 

बातम्या आणखी आहेत...