आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाडात चकमकीत लष्करी जवान शहीद; पुलवामामध्ये एका महिलेची गोळी झाडून हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा भागातील काचलू गावात चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. गुरुवारी अतिरेक्यांची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने गावात शोधमोहीम राबवली. यादरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात जवान रामबाबू सहाय जखमी झाले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 


दुसरीकडे, अतिरेक्यांनी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयावर ग्रेनेड फेकला. तो कार्यालयाबाहेर फुटला. यात चार जण जखमी झाले आहेत. ड्रबगाम भागात अतिरेक्यांनी एका महिलेची गोळी झाडून हत्या केली

 

बातम्या आणखी आहेत...