आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेती काॅलेजबाहेर दगड, लाठ्या-काठ्यांचा वापर करून तरुणांमध्ये तुफान हाणामारी, चाैघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव : बाहेती महाविद्यालयात शनिवारी स्नेहसंमेलन सुरू असताना बाहेरच्या बाजूस तरुणांची गर्दी झाली होती. यात तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. यात चार तरुण जखमी झाले. पोलिसांनी धाव घेऊन टवाळखोरांना बदडले. जखमींना रुग्णालयात दाखल केले.


रोहित संजय अहिरे (वय १६), अजय देविदास इंगळे (वय १८), रोहित किरण साळुंखे (वय १८) व अजय लक्ष्मण गरुड (वय १९, चौघे रा.गेंदालाल मिल) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. बाहेती महाविद्यालयात स्नेहसंमेलन सुरू असताना तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. यात अनेक तरुणांचे महाविद्यालयात प्रवेश नसूनदेखील ते तरुणींची छेड काढण्याच्या उद्देशाने तेथे आले होते. स्नेहसंमेलन सुरू असताना दोन गटात वाद झाले. या वेळी दगड, लाठ्या-काठ्यांचा वापर करून तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली.

 

जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक, राजेश मेंढे, नाना तायडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. टवाळखोरांना बदडून काढत पांगवले. यानंतर जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर विरोधी गटाने तेथे धाव घेत पुन्हा गोंधळ घातला. पाेलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...