आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान खट्टरने शेअर केली 'अ सूटेबल बॉय' वेब सीरिजची पहिली झलक, तब्बूसोबत दिसला रोमँटिक अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अ सूटेबल बॉय'च्या फर्स्ट लूकमध्ये ईशान खट्टर आणि तब्बू. फोटो क्रेडिट : इन्स्टाग्राम - Divya Marathi
'अ सूटेबल बॉय'च्या फर्स्ट लूकमध्ये ईशान खट्टर आणि तब्बू. फोटो क्रेडिट : इन्स्टाग्राम

बॉलिवूड डेस्कः ईशान खट्टरच्या आगामी 'अ सूटेबल बॉय' या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ईशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एख फोटो शेअर केला असून यात तो अभिनेत्री तब्बूसोबत रोमँटिक अंदाजात दिसतोय. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये ईशान मिशीत दिसणार आहे. फर्स्ट लूक शेअर करुन ईशानने कॅप्शनमध्ये लिहिले, "अ सूटेबल बॉयचा फर्स्ट लूक"

  • विक्रम सेठ यांच्या कादंबरीवर आधारित आहे सीरिज

ही वेब सीरिज विक्रम सेठ यांच्या याच नावाने असलेल्या कादंबरीवर आधारित आहे. ही वेब सीरिज मीरा नायर यांनी दिग्दर्शित केली आहे. 6 एपिसोडच्या या सीरिजमध्ये ईशानने राजकारणी महेश कपूर (राम कपूर) चा विद्रोही मुलगा मान कपूरची भूमिका साकारली आहे. मान कपूर व्यवसायाने वेश्या असलेल्या सईदा बाईच्या सौंदर्याकडे आकर्षित होतो. सईदा बाईची भूमिका अभिनेत्री तब्बूने साकारली आहे. ईशान खट्टर, तब्बू आणि राम कपूर यांच्यासह तान्या मानिकतला, रसिका दुग्गल, शहाना गोस्वामी आणि नमित दास यांच्या महत्त्वाच्या भूमिका या वेब सीरिजमध्ये आहेत. 

बातम्या आणखी आहेत...