आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरक्राफ्ट कंपनी गल्फ स्ट्रीमने बनवले सुपर सॉनिक खासगी जेट, इतकी आहे या जेटची किंमत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क -अमेरिकी एअरक्राफ्ट कंपनी गल्फस्ट्रीमने अति श्रीमंतांचा विचार करून  सुपरसॉनिक खासगी जेट जी-६०० ची निर्मिती केली आहे. ०.९ माक गती असलेले हे जेट एका वेळी १९ प्रवाशांसह लंडनपासून  टोकियोदरम्यान कोणत्याही ठिकाणी इंधन न भरता प्रवास करू शकते. या जेटची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये आहे. या विमानात ५१ हजार फूट उंचीवर केबिनमधील प्रेशर इतकेच असेल जितके सामान्य विमानात ४८५० फूट उंचीवर असते, असा कंपनीचा दावा आहे.

 

अति श्रीमंतांसाठी : जेट लॅग अत्यंत कमी जाणवणार असल्याचा दावादेखील कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. हे जेट जगभरातील अति श्रीमंत लोकांसाठीच तयार करण्यात आलेलेे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...