आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसायनांनी भरलेला टँकर पेटला; नागपूर-अमरावती महामार्ग ठप्प

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - रासायनिक पदार्थ घेऊन जाणारा एका टँकर अचानक पेटल्याने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळीजवळ रविवारी दुपारी सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली हाेती. टायर फुटल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले व दुभाजकाला घासत जाऊन टँकर रस्त्यावर अाडवे झाले. काही क्षणांत टँकरने पेट घेतला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुमारे एक तास ही आग धगधगत हाेती.काटाेल, कळमेश्वरनगर परिषद व इतर ठिकाणांहून अग्निशमन दलाचे बंब बाेलावून आग आटाेक्यात आणण्यात आली. पाेलिस अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली व दाेन्ही बाजूंनी वाहने थांबवण्यात आली. बघ्यांचीही मोठी गर्दी जमली हाेती. दाेन्ही बाजूंनी पाेलिस ध्वनिक्षेपकावरून लोकांना पेटत्या टँकरकडे न जाण्याचे आवाहन करत हाेते. त्यामुळे दाेन्ही बाजूंनी ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. दरम्यान, अपघातग्रस्त टँकरच्या चालकाचा मात्र शाेध लागला नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...