आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 देश फिरले आहेत चहाचा स्टॉल चालवणारे दाम्पत्य, दररोज फक्त इतक्या चहाची करतात विक्री; आनंद महिंद्राने केली होती प्रशंसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम : कोचिन येथे राहणारे विजयन आणि त्यांची पत्नी गेल्या 56 वर्षांपासून चहाचा स्टॉल चालवते आहेत. पण यांच्या दुकानात येणाऱ्या लोकांपैकी कमी लोकांनाच माहीत आहे की, या जोडप्याने 23 पेक्षा जास्त देशांची भ्रमंती केली आहे. विजयन आणि त्यांच्या पत्नीने आतापर्यंत सिंगापूर, अर्जेंटीना, पेरू, ब्राझील आणि स्वित्झर्लंड देशात गेलेले आहेत. आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्वीटनंतर या जोडप्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

 

ट्वीटरवरून दिली माहिती
महिंद्रा ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नुकतेच एका ट्वीटद्वारे या दाम्प्यत्याविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, "या दाम्प्यत्याचे नाव जगातील सर्वांत श्रीमंत लोकांची यादी - फोर्ब्समध्ये समाविष्ट नसले. पण त्यांच्या आयुष्याविषयीचा दृष्टीकोन हीच त्यांची खरी संपत्ती आहे." त्यांनी पुढे लिहीले की, "मी पुढच्या वेळी शहरात आल्यावर त्यांच्याकडे चहा आणि त्यांच्या प्रवासाविषयी माहिती घेण्यासाठी जाईल."

 

लहानपणापासूनचे स्वप्न होते - विजयन
विजयन यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले की, "जग फिरणे हे माझे बालपणापासूनचे स्पप्न होते. पैसे कमावून मला ते स्वप्न पूर्ण करायचे होते. स्वप्न पूर्ण करण्याकरता स्थाई कमाई करण्यासाठी रस्त्यावर चहाची विक्री करण्यास सुरुवात केली."


परदेश दौरा करण्यासाठी अशाप्रकारे करता नियोजन
दररोज 300 रूपये जमा केल्यानंतर जी बचत होते त्या पैशातून हे दाम्पत्य दौऱ्यावर जाते. पैसे जर कमी पडले तर बँकेतून कर्ज काढतात. कर्जासाठी आपल्या दुकानाला ते गहाण ठेवतात. फिरून आल्यानंतर पुन्हा पैशांची बचत करून कर्ज फेडतात. कर्च फेडल्यानंतर परत दुसऱ्या दौऱ्याची तयारी करतात. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, विजयन यांच्यावर INVISIBLE WINGS नावाची शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या शॉर्ट फिल्मला फिल्म फेअर अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...