आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरचे जीवन उलगडणाऱ्या 'कार्गो'चे टीझर रिलीज, चित्रपटात अंतराळातील दृष्य दिसत आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - विक्रांत मॅसी आणि श्वेता तिवारी यांच्या 'कार्गो' या सायन्स फिक्शन सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटात मृत्यूनंतरच्या आपल्या आयुष्याची गोष्ट सांगणार असल्याचे टीझर पाहिल्यानंतर वाटते. एक मिनिटाच्या टीझरमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा, अंतराळाचे अनेक दृष्य दाखवण्यात आले आहेत.

अशी असू शकते कथा


टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक स्पेसशिप रोज सकाळी पृथ्वीजवळ येते आणि मृत लोकांची वाट पाहते. चित्रपटात वापरण्यात आलेली स्पेसशिप जेली फिशच्या बायो मॅकॅनिझमपासून प्रोत्साहन घेऊन तयार केली असल्याचे दिग्दर्शिका आरती कदावने सांगितले.

चित्रपटाची मामी महोत्सवात झाली निवड


आरती कादवने चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केल आहे. तर नवीन शेट्टी, श्लोक शर्मा आणि अनुराग कश्यपने निर्मिती केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'कार्गो' चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...