आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Teenager Trying Facebook Live Suicide In Latur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लाइव्ह’ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीस वाचवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पँथर सेना संघटनेच्या पदाधिकारी तरुणीने सोमवारी पहाटे आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी तिने फेसबुक लाइव्ह करत डासनाशक मशीनमधील द्रव्य प्राशन केले. वेळीच ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस आणि कुटुंबीयांनी तिला वाचवले. संघटनेच्या अंतर्गत वादातून सदर तरुणीने पदाचा राजीनामा दिला. परंतु काही कार्यकर्ते तिच्याकडे आपली या पदांसाठी शिफारस करण्याचा आग्रह करीत होते. मानसिक त्रास देण्यासाठी ते जाणीवपूर्वक तसे करीत असल्याचा आरोप करीत या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हाेता. सोमवारी पहाटे फेसबुक लाइव्ह करत तिने टाेकाचे पाऊल उचलले. एका युजरने हा प्रकार पाहून पोलिसांना कळवले. त्यांनी तिच्या घराचा पत्ता शोधून काढत कुटुंबीयांच्या मदतीने तिला रुग्णालयात हलवले.