आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा फूट अजगराचा एका व्यक्तीला विळखा; तब्बल १५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर सुटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे दहा फूट लांब अजगराने  ५८ वर्षीय भुवचंद्रन नायर यांच्या गळ्याला विळखा घातला. सुमारे १५ मिनिटाच्या अथक प्र्रयत्नाने लोकांनी त्यांची मान अजगराच्या विळख्यातून सोडवली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनरेगा योजनेवर सरकारी महाविद्यालयातील झाडे कापण्याच्या कामावर ५५ मजूर काम करत होते. यात नायर यांचाही समावेश होता. दरम्यान त्यांचे लक्ष दहा फूट लांब अजगरावर पडले. नायर मागे हटले पण अजगराने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याने मानेलाच विळखा घातला होता. दरम्यान, अन्य मजूर नायर यांच्या मदतीला धावले. अजगराला एका पोत्यात बांधून त्याला वन विभागाच्या हवाली करण्यात आले.