आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Thorough Practice On Cotton Swabs; Gold Medal Dedicated To Parents! Has A Huge Success At Khelo India

कापसाच्या गोणीवर केला कसून सराव; सुवर्णपदक आता पालकांना अर्पण! गुवाहाटी येथे खेलो इंडिया'त मिळवले उत्तुंग यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभय गुरव, रिंकी पावरा, मधुरा वायकर - Divya Marathi
अभय गुरव, रिंकी पावरा, मधुरा वायकर

नंदुरबार : नंदुरबार आदिवासी भागात पाहिजे तसे क्रीडा वातावरण आणि खेळाचे साहित्य नसताना नंदुरबार जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचा खेळाडू अभय भटू गुरव या खेळाडूने गुवाहाटी येथे पार पडलेल्या खेलो इंडिया' या राष्ट्रीय स्पर्धेत उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. बालपणापासून कापसाच्या गाेणीवर उंच उडीचा सराव करणाऱ्या अभयने सुवर्णपदक मिळवताच खोंडामळी गावात त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आसाम येथे सुरू असलेल्या तिसऱ्या खेलाे इंडिया' या स्पर्धेत उंच उडीत २.७ मीटर उंच उडी मारत अभय गुरव याने उत्तम अशी कामगिरी केली आहे. अभय गुरव याची आई वारली. तरए वडतल नेहमीच आजारी असतात. घरात क्रीडाचे वातावरण नाही. यशवंत हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. मयूर ठाकरे यांनी त्याला नेहमीच मार्गदर्शन केले. दररोज दोन तास सराव करणाऱ्या मयूरने सिनिअर गटात रौप्य पदक, तसेच राज्यस्तरीय ज्युनिअर गटात सुवर्णपदक पटकावले आहे. रांची झारखंड या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर गट स्पर्धेत अभय रोकडे पदकाचा मानकरी ठरला. याच कामगिरीच्या जोरावर अभय गुरव याची खेलो इंडिया स्पर्धेत निवड झाली. पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात तो सराव करीत आहे. नंदुरबारपासून १७ किमी अंतरावर खाेंडामळी या गावात तो राहतो. घराची स्थिती जेमतेम. घरात शिक्षणाचे किंवा क्रीडाचे कुठलेच वातावरण नाही. केवळ जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. त्याची पुणे येथील मिलिटरीमधील स्पोर्ट विभागाच्या वतीने निवड झाली. यशामुळे त्याचे गुरू प्रा. मयूर ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निश्चित चमकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

पालकांचे माेलाचे याेगदान अभय

राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न साकार झाले, त्याचे श्रेय माझी आत्या शीलाबाई हिला मी अर्पण करतो. माझ्या आईचे २००१ मध्ये निधन झाले. त्या धक्क्याने गेली १९ वर्षे माझे वडील आजारी आहेत. आत्याच माझा सांभाळ करते. आईच्या निधनानंतर काही वर्षे मी चंद्रकांत अण्णा बालकाश्रमात लहानाचा मोठा झालो. आता मी नंदुरबार येथील यशवंत महाविद्यालयात शिकत आहे. माझे प्रशिक्षक मयूर ठाकरे हेच मला आर्थिक सहकार्य करीत आहेत,असे अभय म्हणाला.

वडिलांच्या मेहनतीचे माेल; पदक जिंकल्यामुुळे आता आर्थिक चित्र सुधारणार!

रिंकी पावरा युवा धावपटूने पदार्पणातच पदकाचा पल्ला गाठून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र संघाच्या खात्यात तिने एका पदकाची भर घातली. त्यामुळे सर्वांनाच तिच्या कामगिरीचा आनंद वाटताेय. मात्र, यापेक्षाही आता आपण दाेन एक्कर शेतीवर कुंटुबांचा गाडा हाकणाऱ्या शेतकरी वडील आणि आईच्या मेहनतीला हातभार लावू शकणार असल्याचे माेठा आनंद १७ वर्षीय रिंकी पावराला झाला. याच पदकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीच्या बळावर आता तिला घरच्या हलाखीच्या परिस्थतीचे चित्र सुधारण्याची संधी आहे. त्यामुळेच माझ्यासाठी हे पदक सर्वात माेलाचे ठरले आहे, अशी प्रतिक्रीया रिंकी पावराने दिव्य मराठीशी बाेलताना दिली.

सायकलसाठी वडिलांनी विकले घर; मधुराला सुवर्ण

सायकलमध्ये करिअर करण्यासाठी मधुराला माेठा संघर्ष करावा लागला. याच दरम्यान प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सायकलिंगमध्ये नाव कमावले आहे. एकवेळ सायकल घेण्याची आर्थिक स्थिती नसल्यामनुळे मधुराच्या वडिलांना आपले घर विकावे लागले होते. त्यानंतरही त्यांनी आपल्या मुलीचा खेळाचा हट्ट पुरविला. यामुळेच मधुरा देखील आज जे काही मला यश मिळत आहे ते आई-वडिलांच्या सहकायार्मुळेच मिळत असल्याचे मान्य करते. ते नसते, तर मी उभी राहू शकले नसते, असे ती सांगते. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून वडिलांनी तिच्या सरावाकडे आणि आईने तिच्या आहाराकडे लक्ष पुरविले. आजही ते दोघे तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. याच आई-वडीलांच्या मेहनतीला सार्थकी लावताना मधुराने यशाचा माेठा पल्ला गाठला आहेे.

बातम्या आणखी आहेत...