आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणांनी उभारला ट्रॅक्टर ट्रेलरचा सेतू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - बारामती तालुक्यात कांबळेश्वर गावात रविवारी दमदार पाऊस झाला, त्यामुळे जि.प. शाळेतील मतदान केंद्राला पाण्याचा वेढा पडला हाेता. सोमवारी सकाळी काहीसे पाणी ओसरले, मात्र सर्वत्र चिखल झाल्याने मतदारांना केंद्रात जाण्यासाठीही वाट नव्हती. त्यावर उपाय म्हणून गावातील तरुणांनी गावातील ट्रॅक्टरच्या नऊ ट्रॉली आणून त्याचा सेतू तयार करून मतदारांना केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाट तयार केली. त्यामुळे अडचण दूर झाली व मतदानाचे प्रमाणही वाढले.
 

निवडणूक आयोगाकडून दखल
पुराचे पाणी शाळेच्या आवारात घुसल्याने मतदान केंद्रावर पोहोचणे दुरापास्त होते. अशा वेळी तरुणांनी  ट्रॅक्टर ट्रेलरचा पुल उभारला. त्यामुळे मतदारांना येणे सोपे झाले. निवडणूक आयोगाने या सृजनशीलतेची दखल घेतली.
- नवलकिशोर राम (जिल्हाधिकारी, पुणे)