• Home
  • A transgender person arrives to greet a pregnant woman at home, when she refuse to give 21,000 then they stole her money

रोचक / गर्भवती महिलेच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले तृतीयपंथी, 21 हजार रुपये दिले नाही तर घरात शिरून केले असे काही 

हा प्रकार ऐकल्यावर तुम्हीही व्हाल सतर्क 

दिव्य मराठी वेब

Sep 19,2019 12:11:37 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : दिल्लीजवळील गुडगाव येथे अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण हैराण आहे. अनेकदा पहिले जाते की, तृतीयपंथी सणवार, लग्न किंवा बाळाचा जन्म झाल्यावर शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचतात. ते कुटुंबाच्या आनंदात सामील होतात. पण गुडगाव येथे तृतीयपंथ्यानेनी असे काही केले त्यानंतर तुम्हीही सतर्क व्हाल. गुड़गांवच्या सेक्टर 46 मध्ये तीन तृतीयपंथी एका एका घरामध्ये पोहोचले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रेग्नन्ट महिलेला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

पोलिसांनी सेक्टर 50 पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करू घेतली आहे आणि स्पेशल टीम बनवून त्या तृतीयपंथ्यांचा शोध सुरु केला आहे. एसएचओ शाहिद अहमद म्हणाले, 'आम्ही एफआयआर दाखल केली आहे. तपास सुरु आहे.'

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, 'तीन तृतीयपंथी घरी आले आणि पैसे मागू लागले माझ्या पतीने त्यांना 2100 रुपये दिले. पण ते 21 हजार रुपये मागत होते. आम्ही बोलतच होतो तेवढ्यात एकाने माझ्या पतीचे पाकीट घेतले आणि त्यातून 10 हजार रुपये काढून घेतले.' महिलेने हादेखील आरोप केला आहे की, एका तृतीयपंथ्याने तिची सोन्याची चेन खेचण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांनी ओरडायला सुरुवात केली. ज्यामुळे तृतीयपंथी पकडले जाण्याच्या भीतीने कारमधून पळाले.

X
COMMENT