आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भोपाळ : दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या ७५ व्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ दोनदिवसीय प्रेरणा उत्सवाचे आयोजन केले जात आहे.
३० नोव्हेंबर : दोनदिवसीय उत्सवाच्या पहिल्या टप्प्यात ३० नोव्हेंबरला दोन कार्यक्रम होतील. पहिल्या कार्यक्रमात भास्करचे शिल्पकार रमेशजींच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन द संस्कार व्हॅली स्कूलमध्ये सकाळी ११ वाजता होईल. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ प्रमुख पाहुणे तर शिवराजसिंह चौहान व प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा सन्माननीय पाहुणे असतील.
याच दिवशी दुसरा कार्यक्रम रवींद्र भवनच्या मुक्ताकाश व्यासपीठावर कविताओं की एक शाम' सायंकाळी ८ पासून होईल. यात कुमार विश्वास, सुनील जोगी, शकील आझमी व देशातील प्रसिद्ध कवी कविता सादर करतील.
१ डिसेंबर : प्रेरणा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १ डिसंेबरला प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आपल्या निवडक कविता, अफसाने सादर करतील. हा मैं कोई एैसा गीत गाऊं' कार्यक्रम रवींद्र भवनच्या मुक्ताकाश व्यासपीठावर सायंकाळी ६.३० वाजता होईल.
३० नोव्हेंबर : रक्तदान, दान उत्सव, प्रेरणा पुरस्कार व चित्रकलाही
याशिवाय प्रेरणा उत्सवानुसार ३० नोव्हेंबरला देशभर भास्कर समूहात अनेक विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
दान उत्सव : ११ राज्यांत २१ ते २८ नोव्हेंबरपर्यंत दान उत्सव कार्यक्रम चालवण्यात आला. या अंतर्गत वस्त्र, खाद्य सामग्री, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर रोजच्या वापरातील वस्तू जमा करण्यात आल्या. हे दान ३० नोव्हेंबरला िनवडक अनाथालयांत आणि वृद्धाश्रमांत वितरित केले जाईल.
रक्तदान : भास्कर समूहाच्या वतीने देशभर २५० हून अधिक ठिकाणी ३० नोव्हेंबरला रक्तदान शिबिरे होतील.
प्रेरणा पुरस्कार : संस्थेच्या सहकाऱ्यांसाठी रमेशजींच्या मूल्यांवर आधारित प्रेरणा पुरस्कार घोषित केला जात आहे. सामाजिक हित जोपासताना साधेपणा, मानवतावाद, जनसंपर्क आणि व्यवसायात भरारी अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जाईल.
चित्रकला : रमेशजींच्या ७५ व्या जन्मदिनी मुलांमधील अभिव्यक्तीच्या माध्यमातून त्यांचे स्मरण केले जाईल. या वेळी संस्थेतील सहकाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होईल. यात निसर्ग, हवामान बदल, माझे कुटुंब आणि सांस्कृतिक वारसा यासारख्या विषयांवर मुले चित्र काढतील. या चित्रकलेचे कार्ड तयार करून ते विविध निमित्ताने वापरले जातील. यातील काही चांगल्या कलाकृती कार्यालयात लावल्या जातील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.