आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समृध्द, शक्तीशाली व आनंदी भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
शेतीच्या उत्पन्नात 2022 पर्यंत दुपटीने वाढ करणे, 2024 पर्यंत प्रत्येकाला नळाचे पाणी देणे, शेतक-यांसाठी 15 लक्ष कोटी रू. शेती कर्जासाठी ठेवणे, प्रत्येक जिल्हयासाठी एक्सपोर्ट हब निर्माण करणे, शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रूपयांची तरतूद करणे, 112 जिल्हयांमध्ये आयुष्यमान भारत योजनेचा लाभ व्हावा यादृष्टीने हॉस्पीटल्स तयार करण्यासाठी योजना आखणे, कृषी विकासासाठी 16 सुत्रीय योजना करणे, आयकरामध्ये मोठी सुट देणे, बेरोजगारांसाठी विविध उपक्रम हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय आहे.
संस्कृती संवर्धनासाठी डिम्ड युनिवर्सिटी स्थापन करणे, पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठी आर्थीक तरतूद करणे या सह सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातुन अर्थमंत्र्यांनी घेतली आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. जागतीक मंदीच्या काळात सुध्दा या मंदीच्या सावटापासून आपल्या देशाला दूर ठेवण्याच्या दृष्टीने प्रगतीची कास धरणारा उत्तम अर्थसंकल्प या देशातील जनतेला दिल्याबददल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे विशेष अभिनंदन करतो, असे माजी अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.
समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारा सर्वंकष अर्थसंकल्प- चंद्रकांत पाटील
अर्थसंकल्पावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्रानुसार देशाची अर्थव्यवस्था बळकट करतानाच शेतकरी, महिला, युवा, अनुसूचित जाती, आदिवासी, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांच्या कल्याणासाठी तरतूद करणारा सर्वंकष अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केला असून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची सोळा कलमी योजना, प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्याच्या पंतप्रधानांच्या निर्धारासाठी भक्कम आर्थिक तरतूद, जिल्हा रुग्णालयांना जोडून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कल्पक योजना, इन्कम टॅक्समध्ये कपात करून मध्यमवर्गीयांना दिलासा, अनुसूचित जाती-जनजाती-ओबीसी यांच्या कल्याणासाठी भक्कम आर्थिक तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे, देशाची अर्थव्यवस्था भक्कम करणे आणि दुर्बल घटकांची काळजी घेणे यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे.
त्यांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला जोरदार चालना देण्यासाठी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानाचा आणि व्यावसायिक वातावरणाचा देशाला पुरेपूर लाभ व्हावा यासाठीही या अर्थसंकल्पात उपाय केले आहेत. बँकांतील ठेवींचे विमा संरक्षण एक लाखावरून वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कररचना सोपी करणासाठीची पावले आणि करदात्याच्या हक्कांची नोंद घेणे ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. एकूणच भारताची अर्थव्यवस्था भक्कम करून आर्थिक विकासाची नवी उंची गाठण्यासाठीची पावले या अर्थसंकल्पात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.