आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - कोणता क्षण माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल याचा काही नेम नसतो. १९७७ साली स्व. इंदिराजी गांधी यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड होऊन ते वसमतला उतरले नसते तर मुंजाजी जाधव व सूर्यकांता पाटील कदाचित आमदारही झाले नसते. परंतु इंदिराजींच्या एका भेटीने या दोघांचेही आयुष्य पार बदलून गेले.
१९७७ मध्ये आणीबाणीच्या रागातून देशात जनता राजवट आली. इंदिराजी एकाकी पडल्या. त्यांच्याकडे मोजकेच कार्यकर्ते राहिले. जनता राजवटीत इंदिराजींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. परंतु त्याही परिस्थितीत त्या लढत राहिल्या. लोकांशी नाळ त्यांनी तुटू दिली नाही. १९७७ मध्ये अशाच एका आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचा नांदेड दौरा ठरला. त्या हेलिकाॅप्टरने येत असताना त्यांचे हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड झाला व इमर्जन्सी लँडिंग वसमतला करण्यात आले. त्यावेळी मुंजाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदिराजींचे स्वागत वगैरे करून चहापानाची व्यवस्था केली. ते लक्षात ठेऊन १९८० च्या विधानसभा निवडणुकीत इंदिराजींनी त्यांना उमेदवारी दिली व ते विजयी झाले.
इंदिराजींनी स्वत: कपडे धुतले
त्यानंतर सूर्यकांता पाटील व इतर कार्यकर्ते वसमतला पोहोचले. इंदिराजींना घेऊन ते नांदेडच्या विश्रामगृहात आले. त्यावेळी इंदिराजींनी त्यांना साडी मागितली. काँग्रेस नेत्यांनी भरजरी साड्या आणून त्यांच्या समोर ठेवल्या. ‘मै ऐसी साडी पेहनती हू क्या?’ असं त्या म्हणाल्या. शेवटी इंदिराजींनी सांगितले, ‘एक सनलाईट साबण लाव. मै साडी धोके, नहाऊंगी.’ त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साबण आणून दिल्या.
लाेकसभेत सूर्यकांता पाटील विजयी
इंदिरा गांधी वसमतहून परत गेल्यानंतर काही दिवसांतच जनता राजवट जाऊन लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळी सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मागितली. ‘तू अभी छोटी है, लोकसभा मत लढ. तुझे मै विधानसभा मे भेजती हूं’ असा शब्द इंदिराजींनी दिला. १९८० साली इंदिराजींनी तो शब्द खराही करून दाखवला. सूर्यकांता पाटील हदगावमधून १९८० साली विधान सभेत निवडून आल्या. आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावतच गेला.
तेव्हा इंदिराजी सूर्यकांता पाटील यांना घेऊन विश्रामगृहाच्या खोलीत गेल्या. त्यांनी आतून दार बंद केले. मै पहेले कपडे धोती, बादमे नहा लेती। तू बाहर रुक जा। मै साडी धोने के बाद सुखाने मे मेरी मदत कर असं त्यांनी सूर्यकांता पाटील यांना सांगितले. त्यानंतर खोलीतील पंख्याचा स्पीड वाढवून दोघींनी साडी वाळवली. तयार होऊन इंदिरा गांधी बाहेर आल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.