आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट एअर बलूनद्वारे आलेल्या लष्कराच्या साहसी 'जय भारत' मोहिमेचे जंगी स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- देशांतर्गत युवा वर्गाला भारतीय लष्कराच्या जवानांचे साहसी कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भारतीय सेनेच्या साहसी बटालियन उत्तर-दक्षिण भारत दौऱ्यावर आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास या साहसी अभियानाचा आहे. शनिवारी संध्याकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणावर दोन हॉट एअर बलूनचे आगमन झाले होते. रविवारी सकाळी भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवत ते नांदेडकडे रवाना झाले. 

 

रविवारची पहाट अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने कुतूहलाची ठरली शहरातील आबालवृद्ध सकाळी साडेपाच वाजेपासूनच बहुसंख्येने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर दाखल झाले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे अध्यक्षतेत पार पडलेल्या मुख्य सोहळ्याला ११ महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल सी. एलवर्सन, जय भारत अभियानाचे प्रमुख लेफ्ट. कर्नल विवेक तेहलावत, भोपाळ यांचे सह सुभेदार राजेश कुमार, जबलपूर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, वन विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, सौ. किर्ती भाले, डॉ सुधीर वडतकर, डॉ. संजय भौयर, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. शेषराव चव्हाण, प्रा. संजय कोकाटे, एन सी सी युनिट चे श्री. भावसार . प्रा. विवेक खांबलकर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांच्यासह जय भारत अभियानाचे सर्व कर्नल, सुभेदार , नायब सुभेदार आदींची मंचावर उपस्थिती होती. 

 

कार्यक्रमाचे सुरुवातीला कर्नल विवेक तेहलावत यांनी मोहिमेचे उद्दिष्ट, प्रवासातील रोमांच विषद करीत अधिकाधिक संख्येने भारतीय सैन्यात अधिकारी होऊन देश सेवा करण्याचा सल्ला दिला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या हॉट एअर बलून सोबतच इतर बलूनद्वारे साहसी जवान हवाई मार्गाने रवाना होत असून आम्हा सर्वांसाठी हा अतिशय गौरवाचा क्षण असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. भाले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. लेफ्ट. कर्नल विवेक तेहलावत यांनी डॉ. भाले यांना स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता दर्शवली. विद्यापीठ परिवाराचे वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ.भाले आणि कर्नल सी. एलवर्सन यांनी जय भारत अभियानाच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. 

 

या नयनरम्य सोहळ्याला शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाचे एन सी सी कॅडेट्स, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थांना उत्साह दाखवत गर्दीत केली होती. अकोला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या या उपक्रमाला उपस्थित राहून भारतीय सैन्य दलाबद्दल अधिक जाणून घेत भारत मातेच्या जय घोषाने आसमंत दणाणून टाकला .विद्यापीठ क्रीडांगणावर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने तसेच एन सी सी कँडेटस आदींनी अथक परिश्रम घेतले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात डॉ. ययाती तायडे, डॉ. सुधीर वडतकर, डॉ. संजय भोयर, डॉ. शेषराव चव्हाण , डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. किशोर बिडवे, प्रा. विवेक खांबलकर, प्रा. संजय कोकाटे , शशी भोयर आणि विद्यार्थी कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गानीं परिश्रम घेतले. 

 

हवेतील साहसाने मोहीम ठरतेय लक्षवेधी 
जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास या हॉट एअर बलूनद्वारे लष्कराचे जवान करीत आहेत. एका बलूनमध्ये ८ तर दुसऱ्यामध्ये ३ जवान अाहेत. तर इतर ताफा वाहनातून प्रवास करत आहे. जम्मू येथील झोरावर स्टेडियम येथून अतिशय दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरु झालेली ही मोहीम देशभरातील जवळपास ३१ स्थानकांवर थांबा घेऊन हवेतील साहसाने लक्षवेधी ठरत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...