आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नन्सीदरम्यान महिलेचा झाला मृत्यू, ऑपरेशनद्वारे डॉक्टर्सने केली सक्सेसफुल डिलिव्हरी, पतीला मात्र कळत नव्हते आनंद व्यक्त करावा की, दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फीनिक्स : अमेरिकेत एका कपलसाठी आनंदाचा असणारा एक दिवस अचानक दुखत बदलला. पत्नीची दुसरी डिलिव्हरी होती आणि सर्वकाही नॉर्मल होते. पण ऐन डिलिव्हरीच्या वेळी महिलेची प्रकृती बिघडली. ऑपरेशनने मुलाचा जन्म तर झाला पण महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तेव्हाच पत्नीला शेवटचे गुडबाय म्हणण्यासाठी आलेला तिचा पती तिच्या कानात म्हणाला, "जर तुझ्या आयुष्यात एखादी लढाई राहिली असेल तर तू लढ" हे म्हणल्याच्या 24 तासांतच त्या महिलेने डोळे उघडले. 

डॉक्टरांनी सांगितले होते क्लीनिकली डेड... 
- फीनिक्सचे राहणारे डॉज आणि मलेनिया आपल्या मुलाच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार होते. लेबर पेन सुरु झाले आणि मलेनियाला हॉस्पिटलमध्ये नेले गेले. पण तेव्हाच तिची तब्येत खराब होऊ लागली. 
- मलेनिया एम्निऑटिक फ्लूड एम्बॉलिज्म कंडीशनने ग्रस्त होती. अचानक तिच्या हृदयाची धडधड बंद झाली. तिला इमर्जन्सी केयरला पाठवले गेले. तिथे  डॉक्टर्सने तिला क्लीनिकली मृत घोषित केले. 
- डॉजने सांगितले, "वाइफला डेड सांगितल्यानंतर डॉक्टर्सने ऑपरेशनद्वारे मुलीची डिलिवरी केली. डॉक्टर्सनेही सनीतले होते की, ती जरी वाचली तरीदेखील तिचे हार्ट आणि लंग बदलावे लागेल. त्यानंतरही ती डॅमेज ब्रेनसोबतच राहील. डॉक्टर्स पूर्णवेळ तिला कृत्रिम पद्धतीने श्वास देण्याचा प्रयत्न करत होते. पण कशानेही काहीही फरक पडत नव्हता."

गुडबाय मेसेजने बदलली गोष्ट... 
- डॉक्टरने डॉजला सांगितले होते की, आता तिला गुडबाय म्हणायची वेळ अली आहे. तेव्हा तो आपल्या वाइफकडे शेवटचे गुडबाय म्हणण्यासाठी गेला. आणि तिच्या कानात काहीतरी म्हणाला. 
- त्यांनतर असे वाटले की, जसे या शब्दांनी मलेनियाला एक वेगळीच ताकद दिली. तब्बल 24 तासातच मलेनियाने डोळे उघडले.  
- त्यांनतर डॉजने तिला आपली मुलगी ग्रैबिएलाचा फोटोही दाखवला. जिला तिने क्लीनिकली डेड अवस्थेत जन्म दिला होता. हे सर्व हॉस्पिटल स्टाफ आणि फॅमिलीतील लोकांना हैराण करणारे होते. 
- डॉजने सांगितले ती तिची रिकव्हरी एका चमत्कारापेक्षा कमी नव्हती. तिने डॉक्टरांच्या बाकीच्या त्या सर्व गोष्टीही खोट्या ठरवल्या, ज्यामध्ये हार्ट आणि लंग ट्रांसप्लांट चा उल्लेख होता. 

काय होते या कंडीशनमध्ये ?
एम्निऑटिक फ्लूड एम्बॉलिज्म प्रेग्नन्सी दरम्यान होणारे कॉम्पलिकेशन आहे, ज्यामध्ये जीव जाण्याची शक्यता असते. हे लेबरमध्ये गेल्याने किंवा किंवा बाळाच्या जन्मानंतर लगेच एम्निऑटिक फ्लूड पोटात रक्तात मिसळते. याचा परिणाम हार्ट आणि लंगवर होतो आणि ते काम करणे बंद करतात. 

बातम्या आणखी आहेत...