Home | National | Other State | A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, Gujarat

स्टेजवर येऊन महिलेने राहुल गांधींना केले Kiss; मग घातली फुलांची माळ, अशी होती रिअॅक्शन, व्हिडिओ झाला व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 05:50 PM IST

2014 मध्ये आसामात राहुल गांधींसोबत असाच प्रसंग घडला होता.

  • A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, Gujarat
    नॅशनल डेस्क - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत एका महिलेने त्यांना किस केले आहे. योगा-योगाने व्हॅलेनटाईनच्या दिवशी ही घटना घडल्याने तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आपल्या सहकाऱ्यांसह राहुल गांधींच्या स्टेजवर येते. यानंतर त्यांच्या गालावर किस करून फुलांची माळ घालते. यानंतर इतर महिलांनी राहुल गांधींना माळ घातल्या. काँग्रेस अध्यक्ष गुजरातच्या गुरुवारी वलसाडमध्ये एका सभेला संबोधित करत असताना ही घटना घडली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी 2014 मध्ये राहुल गांधी आसाम दौऱ्यावर असताना अचानक दोन महिला त्यांना किस करण्यासाठी येऊन धडकल्या होत्या. पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

Trending