Home | National | Other State | A woman was trapped between the train and platform at Samastipur station

चालत्या रेल्वेत घाईने चढणे महिलेच्या जीवावर बेतले, आरपीएफ जवानाच्या सावधगिरीने थोडक्यात बचावली महिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 11:33 AM IST

समस्तीपूर स्टेशन वरील घटना

  • A woman was trapped between the train and platform at Samastipur station

    समस्तीपूर (बिहार) - मंगळार रोजी आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार गांवपूर येथील केदार सिंह पत्नी संगितासोबत हाजीपूरला जाण्यासाठी समस्तीपूर रेल्वे स्थानकावर गेले होते. दरम्यान संगिता प्लॅटफॉर्म नंबर 7 वर चालत्या गाडीत घाईने चढत असताना घसरून पडली. दरम्यान प्लॅटफॉर्मवर उपस्थित आरपीएफ जवान बृजेश सिंह यांनी धाव घेत महिलेला पकडले. ट्रेन जाईपर्यंत त्यांनी तिला पकडून ठेवले होते. त्यानंतर जवानाने ट्रेन गेल्यानंतर त्या महिलेला प्लॅटफॉर्मवर आणले.

    या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. आरपीएफ निरीक्षक आलम अंसारी यांनी सांगितले की, बृजेश सिंह यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात येणार आहे.

Trending