नाशिक / अजमेर दर्गा दर्शनासाठी जाण्याचा बहाणा करत मामीनेच नवविवाहित भाचीला दलालास विकले

पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत दलालाने केला अत्याचार

प्रतिनिधी

Jun 24,2019 10:02:30 AM IST

नाशिक - वडाळा येथील नवविवाहितेला अजमेर दर्गा दर्शनासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करत तिची तिच्या मामीनेच मध्य प्रदेशात दलालाला विक्री करून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दलालाने वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांत दिली.


वडाळा गावी राहणाऱ्या युवतीचा २२ मार्च रोजी राजस्थानातील सिरोई येथे युवकाशी विवाह झाला होता. रमजान असल्याने नवविवाहित माहेरी आली होती. येथेच राहणाऱ्या मामीला भेटण्यास ती गेली. मामीच्या घरात संशयित परवीन ऊर्फ राणी नावाची महिला आणि शाहरुख ऊर्फ चेत्या हे आधीपासूनच बसलेले होते. मामीने पीडितेला “अजमेरला दर्शनासाठी जायचे अाहे. तुझ्या पतीला अजमेरला बोलवून घे. येथून तू सासरी जा,’असे सांगत ७ जून रोजी खासगी बसमध्ये बसवले. बस राजस्थानला न जाता मध्य प्रदेशाच्या रतलाम येथील जावरा येथे गेली. येथे पीडितेला राणीने एका घरात थांबवले आणि नंतर जिवे मारण्याची धमकी देत दुसरे लग्न करण्यास सांगितले. रात्री एका खोलीत डांबून ठेवत चेत्याने पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने येथील नातेवाइकांच्या मदतीने सुटका करत नाशिक गाठले.

X
COMMENT