Amazon / अॅमेझॉनवरून खरेदी केलेले प्रॉडक्ट परत करण्यासाठी एक महिला थेट बेजोस यांच्याकडे गेली

अॅमेझॉनच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत घडली घटना 
 

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 11:56:00 AM IST

सॅन फ्रॅन्सिस्को - बुधवारी अॅमेझॉनच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत एक मजेदार घटना घडली. एका महिलेने थेट अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोसकडे प्रोडक्ट रिटर्न करण्याचा प्रयत्न केला. असे करणाऱ्या महिलेकडे देखील अॅमेझॉनचे शेअर्स आहेत. तिने कंपनीच्या वेबसाइटवरून हे प्रोडक्ट मागवले होते. पण तिला ते परत करायचे होते. एका पत्रकाराने ट्वीट करून या घटनेविषयी सांगितले.

प्रॉडक्ट रिटर्न करण्यात 4 वेळेस आले अपयश
महिलेचे म्हणणे आहे की, तिने योग्य ठिकाणावर चारवेळेस प्रॉडक्ट रिटर्न करण्याचा प्रयत्न केला पण ते झाले नाही. यामुळे तिने थेट बेजोस यांच्याकडे प्रॉडक्ट रिटर्न करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बेजोस यांना धक्का बसला पण त्यांनी अत्यंत मिश्कील अंदाजात परिस्थिती हाताळली.

बेजोस महिलेला म्हणाले की, 'तुम्हाला येथे यावे लागले याबद्दल मी तुमची माफी मागतो.' दरम्यान आणखी कोणाला काही रिटर्न करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी तेथील उपस्थित लोकांना विचारला.

X
COMMENT