आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड : एक वर्षापूर्वी महानदी पाण्याने तुडुंब भरलेली होती, पात्र दोन किमी रुंद होते; आज तिचे मैदानात रूपांतर, गवत उगवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - हे छायाचित्र छत्तीसगड आणि ओडिशाची सर्वात लांब नदी महानदीचे आहे. रायगड शहरापासून २५ किमीवरील सूरजगडमध्ये श्रावण महिन्यात महानदीच्या पात्राची रुंदी सुमारे दोन किमी होते. पण यंदा पाऊस कमी झाल्याने तेथे कोरडे मैदान दिसत आहे. जेथे नदी तुडुंब भरलेली राहत होती, तेथे गवत उगवले आहे.


आज १२ राज्यांत जोरदार पावसाची शक्यता: मान्सून आसाम, मेघालय, सिक्कीम, गुजरातचे सौराष्ट्र, कच्छ, केरळमध्ये सक्रिय आहे. हवामान विभागानुसार, प. बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, यूपी, उत्तराखंड, पूर्व मप्र, हिमाचल, जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगडच्या वर कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या राज्यांत मंगळवारी किंवा बुधवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...