आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Year Of Togetherness : Nick Wrote In A Romantic Post 'It Is A Honor To Be Your Husband, Priyanka ...'

सोबतीचे एक वर्ष : निकने रोमँटिक पोस्टमध्ये लिहिले - 'तुझा पती असणे सन्मानाची बाब आहे प्रियांका...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांना एकत्र येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शनिवारी कपलने हा खास प्रसंग आपल्या पद्धतीने सेलिब्रेट केला. मात्र दोघे सोबत नव्हते. पण सोशल मीडियाद्वारे त्यांनी एकमेकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. निक अमेरिकामध्ये होता तर प्रियांका यूनिसेफची ब्रांड एम्बेसडर म्हणून इथियोपियामध्ये कुपोषित मुलांना भेटायला गेली होती.  

 

निकने लिहिले, तुझा पती असणे सन्मानाची गोष्ट... 
निकने अशातच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये काढलेला एक रोमँटिक फोटो शेयर करून लिहिले, "एका वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मी मित्रांसोबत हॉलिवूड बाउलमध्ये 'ब्यूटी एंड द बीस्ट' पाहायला गेलो होतो. त्यातील एक फ्रेंड महिला होती, जी माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझी विश्वासपात्र, माझी सुंदर पत्नी बनली. मी सोबतच्या आतापर्यंतच्या या सुंदर प्रवासाबद्दल खूप आभारी आहे. तू माझ्या हसण्याचे कारण आहेस आणि आणि मला अजून परागती करण्यासाठी प्रेरित करते. तुझा पती असणे माझयासाठी सन्मानाची बाब आहे. आय लव्ह यू प्रियांका चोप्रा."

 

 

प्रियांकाचा रिप्लाय - माझ्या आयुष्यात तू सर्वात अद्भुत...  
निकची पोस्ट वाचल्यानंतर प्रियांका चोप्राने रिप्लाय केला. तिने लिहिले, "माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे झाले, त्यातील सर्वात अद्भुत तुझे येणे आहे. आय  लव्ह यू बेब." केवळ प्रियांकाचा नाही तर तिचे फॅन्सदेखील निकच्या या स्टाईलचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, "जर माझा होणार नवरा माझ्याबद्दल असे काही बोलला तर मी त्याला घटस्फोट मागितला असता." दुसऱ्या एका यूजरचे कमेंट आहे, "एवढे प्रेमळ होणे बंद करा. आमचे नाम सहन करू शकत नाही."

 

प्रियंका निकला म्हणाली सर्वात चांगला पती... 
प्रियांका चोप्रानेदेखील आपल्या पहिल्या डेटिंग अॅनिवर्सरीला निकविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्याने हॉलिवूड सिंगर मारिया कैरीसोबतच एक फोटो शेयर केला आणि लिहिले, "सर्वात चांगला पती. कुणाचे स्वप्न खरे होणे. एवढेच नाही तर तो जेव्हा व्यस्त होता आणि आम्ही वेगळे होतो, तेव्हाही त्याने सुनिश्चित केले की, आमच्या सोबतीचे एक वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव मी माझ्या फेव्हरेटसोबत साजरा करावा. अतुलनीय मारिया कैरी तू अदभुत आहेस. तुला भेटून खूप छान वाटले. धन्यवाद एका अप्रतिम शोसाठी. बेबी (निक जोनस) तू नेहमी माझा राहशील. प्रेमाचे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा..."