Home | Maharashtra | Mumbai | A young boy rescues a four year old innocent girl from 35 year

झाडांमागून येत होता रडण्याचा आवाज, जाऊन पाहताच मुलीच्या तोंडातून रक्त दिसले; तिच्या शेजारीच उभा होता नराधम, म्हणाला- तिला बाथरूमसाठी आणले...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 03:12 PM IST

एका तरुणाने प्रसंगावधान दाखवून चिमुरडीला सोडवले नराधमाच्या तावडीतून

  • A young boy rescues a four year old innocent girl from 35 year

    मुंबई- चार वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यावेळी तिथून जाणाऱ्या एका तरुणाला झाडांच्या मागे मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांने त्या नराधमाच्या तावडीतून मुलीची सुटका केली. सरवीन सिंघ (वय25) असे या तरुणाचे नाव आहे. सरवीनने पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी हजर होऊन आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव विजय यादव(वय35) असून पोलिसांनी त्याच्यावर अनेक कलमांअतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहे.

    मुलीच्या तोंडातून रक्तस्त्राव पाहून तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय

    सोमवारी दुपारी सरवीन रसत्याने जात असताना त्याला एका झाडामागून मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्याने आवाजाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला झाडामागे अल्पवयीन मुलगी नग्न अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. तिच्या शेजारी एक व्यक्ती उभा होता. सरीनने त्याला विचारले असता त्याने ती आपली मुलगी असून तिला बाथरुमसाठी घेऊन आल्याचे सांगितले. परंतु मुलीच्या तोंडातून रक्तस्त्राव पाहून सरीनला त्याचा संशय आल्याने सरीनने त्याला पकडले. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर सरीनने त्याला धक्का देऊन तो मुलीसह मुख्य रस्त्यावर आला. तिथे लोकांची मदत मागून त्याने पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन आरोपीला अटक केली. मुलीला उपचारासाठी दाखल केल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले.

    पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी विजय मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिला झाडांच्या मागे घेऊन गेला. तिथे त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरवीनने प्रसंगावधान दाखवून या अल्पवयीन मुलीची अब्रु वाचवली. आरोपीला विजयला अटक केल्यानंतर त्याच्यावर अनेक कलमांअतर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

Trending