आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Young Man Came From Singapore To Noida Behind The Woman; Said Her Husband's Ghost Chasing Her

महिलेच्या मागे सिंगापूरहून नोएडात आला तरुण; म्हणाला- तिच्या पतीचा आत्मा करवताेय पाठलाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - सिंगापूरहून ४२ वर्षीय महिलेचा पाठलाग करत एक तरुण थेट नोएडापर्यंत आला. याप्रकरणी संबंधित महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, ताे तरुण माझ्या मृत पतीचा आत्मा सांगून मला नाहक त्रास देत आहे. त्यामुळे मला घराबाहेर पडणे कठीण झाल्याचा आराेप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पाेलिसांनी त्या तरुणाला अटक केली व पुन्हा संबंधित महिलेचा पाठलाग न करण्याची तंबी देऊन साेडून दिले आहे. 


दरम्यान, माझ्या आत संबंधित महिलेच्या पतीचा आत्मा वास करत असून, त्याच्याच सांगण्यानुसार मी तिचा पाठलाग करत आहे. यात माझा काहीही दाेष नाही, असे या प्रकरणातील तरुणाचे म्हणणे आहे, तर त्याच्या सततच्या पाठलागामुळे मी दाेन वर्षांपूर्वी सिंगापूरहून नोएडात आले; परंतु फेसबुकच्या माध्यमातून त्याला मी नोएडात असल्याचे कळले. त्यामुळे ताेदेखील नोएडात आला असून, एका हाॅटेलमध्ये थांबला आहे. तसेच तेथून मला ब्लॅकमेल करून त्रास देत आहे. तसेच मीच २००८ मध्ये हेलिकॉप्टर क्रॅश करून तुझ्या पतीची हत्या केलीय. तेव्हापासून तुझ्या पतीचा आत्मा पाठलाग करवून घेताेय, असे संबंधित महिलेेने सांगितले.

 

दाेघांची ऑर्कुटवर झाली हाेती मैत्री; साेबतही राहिले

या प्रकरणातील महिला मूळची नोएडाची रहिवासी असून, लग्नानंतर ती सिंगापूरला स्थलांतरित झाली. तिच्या पायलट पतीचा २००८ मध्ये मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे ३५ वर्षीय आरोपी तरुण मेरठमध्ये राहताे. २००९ मध्ये सिंगापूर विमानतळावर त्याला नाेकरी मिळाली हाेती. तेव्हापासून ताे सिंगापुरातच राहताेय. त्या वेळी त्याची ऑर्कुटवर संबंधित महिलेशी मैत्री झाली हाेती. त्यानंतर दाेघेही दीर्घकाळपर्यंत रिलेशनशिपमध्येही राहिले.