आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या कस्टडीतून बाहेर खेचुन तरुणाला जबरदस्त मारहाण; जमावाकडून एका निष्पाप जिवाचा बळी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शामली- उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांसमोर जमावाची गुंडागर्दी पाहायला मिळाली. पोलिसांच्या डायल 100 या गाडीतून एका तरुणाला बाहेर खेचुन मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपुर्ण घटनेदरम्यान पोलिस बघ्याची भुमिका घेत असताना एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर चौफेर टीका होत आहे.

 

पोलिसांसमोर तरुणाला बेदाम मारहाण

> झिंझाना परिसरात दारुच्या नशेत गुंग असलेल्या तरुणाचा गावातील लोकांसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने गावातील लोकांनी डायल 100 या पोलिस पथकाला बोलावले. पोलिस पोहचल्यानंतर त्यांनी तरुणाला गाडीत बसवले परंतु तिथिल जमावाने तरुणाला गाडीतुन बाहेर खेचुन त्याला मारहाण सुरू केली.

 

जमावाविरुद्ध कारवाईची मागणी 

> शामलीचे एसपी अजय कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळी बघ्याची भुमिका घेणाऱ्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मृताच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हेगारांना अटक करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...