Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | A youth post on his fb wall that he is terrorist

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या तरुणाची दहशतवादी असल्याची पोस्ट; जळगाव शहरात मोठी खळबळ

प्रतिनिधी | Update - May 23, 2019, 09:22 AM IST

जळगावच्या तरुणाच्या पोस्टनंतर पोलिस लागले कामाला

  • A youth post on his fb wall that he is terrorist

    जळगाव - एका कामासाठी शहरातील अनेक लोकांकडून सुमारे पाच कोटी रुपये गोळा करून फरार झालेल्या एका तरुणाने बुधवारी स्वत:च्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट शेअर केली. आपण “जैश ए मोहंमद’ या आतंकवादी टोळीचे सदस्य असून लवकरच भारतातील पाच मोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे त्याने वॉलवर लिहिले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून तपासयंत्रणा त्याच्या शोधासाठी कामाला लागल्या आहेेत. दरम्यान, ही पोस्ट त्यानेच लिहिली आहे? की दुसऱ्या कोणी त्याचे अकाऊंट हॅक केले आहे का? या संशयावरून देखील सायबर पोलिस तपास करत आहेत.


    समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (वय ३७, रा.रामनगर) असे या तरुणाचे नाव आहे. १० जानेवारी २०१९ रोजी अमान इरफान अन्सारी (वय २०, रा.फातेमानगर) या तरुणाने समीर शेख याच्या विरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर याने मोबाईल रिचार्ज करण्याची वेबसाईट तयार करून देण्याच्या नावाने तीन वेळा करून एकूण ३४ लाख ९० हजार ६४८ रुपये घेतले. त्या मोबदल्यात वेबसाईट तयार न करून देता फसवणूक केली. या गुन्ह्यात सायबर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, समीरने अतीया रिचार्ज या नावाने तयार केलेल्या फेसबुक वॉलवर बुधवारी सकाळी आक्षेपार्ह मजकुर पोस्ट झाला. दुपारी १२ वाजेपर्यंत ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली हाती. दरम्यान, या संदर्भात पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी, पोलिस उपअधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी सुरक्षायंत्रणांची बैठक घेऊन सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, समीर कुटुंबासह सुमारे पाच वर्षांपासून जळगावात राहत होता. लोकांची फसवणूक केल्यानंतर तो कुटुंबीयांसह बेपत्ता झाला आहे.

    समीर नेपाळला असल्याचा अंदाज
    इंटेलिजन्स ब्यूरोचे काही कर्मचारी दुपारी पोलिस मुख्यालयात दाखल झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. यांनतर ते तपासाला निघाले होते. समीर हा जानेवारी महिन्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात बेपत्ता असल्यामुळे सायबर पोलिस त्याच्या शोधात होते. दोन महिन्यांपूर्वी इंदूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर एक पथक इंदूर येथे गेले होते. तत्पूर्वी समीर तेथून बेपत्ता झाला. सध्या तो नेपाळला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Trending