आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदि शक्तिपीठ : कुठे देवीच्या आधी गरिबांना भोजन, कुठे महिलांना प्रवेश निषिद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतासह ५ देशांत (पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ) एकूण ५१ शक्तिपीठे अाहेत. यात ४ आदि शक्तिपीठे असून येथे देवीच्या शरीराचे प्रमुख अवयव पडले होते, तर उर्वरित ठिकाणी इतर अवयव पडले होते. दै. दिव्य मराठी आपल्या वाचकांना नेहमी काही तरी नवे आणि वेगळे देत आला आहे. या वेळी ४ शक्तिपीठांचा लाइव्ह रिपोर्ट. सोबत आश्विनमध्ये दुर्गापूजा सुरू झाल्याची कहाणी...


अकाल बोधोन, म्हणजे आश्विन मासात दुर्गापूजा सुरू झाल्याची कथा...
पूर्वी दुर्गामातेची पूजा चैत्र महिन्यात होत असे. श्रीरामांनी रावणाचा पराभव करण्यासाठी प्रथम आश्विनमध्ये दुर्गामातेची पूजा केली. म्हणून बंगालमध्ये याला अकाल बोधोन म्हणजे अवेळी पूजा म्हणतात. रावणाला पराभूत करण्यासाठी श्रीरामांना शक्ती हवी होती म्हणून त्यांनी दुर्गापूजा सुरू केली. १०८ नीलकमलांनी पूजा व्हावी, अशी दुर्गामातेची अट होती. श्री हनुमान यासाठी १०८ नीलकमल घेऊन येतात. मात्र, दुर्गामाता यातील एक फूल लपवून ठेवते. यामुळे नीलकमलासारखे नयन असलेले श्रीराम चिंतेत पडतात. ते आपला एक डोळा काढून देवीला वाहतात. एवढ्यात दुर्गामाता ‘विजयी भव’ असा आशीर्वाद देते. नवरात्रात अष्टमी-नवमीच्या रात्री राम-रावण असे भीषण युद्ध झाले होते. म्हणून आजही मध्यरात्री विशेष पूजा केली जाते.


पुढील स्लाइडवर वाचा, दक्षिण कालिका : दशमीला मंदिर महिलांकडे, पुरुषांना प्रवेश निषिद्ध

बातम्या आणखी आहेत...