आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aaj K Shivaji Narendra Modi's Book Published By BJP, Compared Modi To Shivaji Maharaj

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' नावाचे पुस्तक भाजपकडून प्रकाशित, महाराजांशी तुलना केल्यामुळे संतापाची लाट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पुस्तक लिहीले आहे

नवी दिल्ली- 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी...' नावाने दिल्ली भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेलं एक पुस्तक प्राकशित झाले आहे. भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रकाशन कार्यक्रमानंतर भाजपवर टीकेच झोड उठली आहे. पुस्तकातून मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते.

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींवर ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ अशा आशयाचे पुस्तक लिहिले आहे. जय भगवान गोयल यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करत या पुस्तकाची माहिती दिली. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकामुळे आता नवा वाद उद्भवला आहे. 

यावर शिवेसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि इतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.