Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 26, 2019, 12:00 AM IST

जाणून घ्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कसा राहील तुमचा दिवस

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi
  आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी कलाष्टमी दिन विशेष आहे. आजच्या दिवशी राहू काळ सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. उर्वरीत दिवस उत्तम असा राहील. एकूणच 12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरेल. तर उर्वरीत राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
  व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ: शुभ रंग : पिस्ता  | अंक : २
  आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. 

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : अबोली | अंक : ५
  हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत. 

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
  वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ४ 
  नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे. ज्येष्ठांना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.  

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : पिवळा | अंक : ६
  हौशी मंडळींना आज  जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
  आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.  

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५           
  आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू :  शुभ रंग : तांबडा| अंक : ९
  पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर  तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ७
  अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
  आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी. 

 • aajache rashibhavishya friday 26 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३ 
  कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

Trending