Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 29, 2019, 12:00 AM IST

12 राशींपैकी 3 राशी वगळता आजचा दिवस सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi
  सोमवार, 28 एप्रिल रोजी दिवसाची सुरुवात अमृत शुभमुहूर्ताने होईल. तर राहू काळ सकाळी 7.30 ते सकाळी 9.25 पर्यंत राहील. आठवड्यातील कामाचा पहिला दिवस 12 राशींपैकी 3 राशी वगळता सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जा मिळवून देणारा ठरेल. या तिन्ही राशींच्या लोकांनी आज कमी बोलणे आणि सावध राहणेच योग्य राहील.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
  व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.   

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ: शुभ रंग : निळा  | अंक : ५
  कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नरंजन सोडून कृतीस प्राधान्य द्याल.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १
  कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क :  शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
  आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय अाहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल. 

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ४ 
  घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव  राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. 

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
  आज तुम्हाला काही मान अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
  नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ३           
  आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू :  शुभ रंग : भगवा| अंक : ७
  ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : मरून | अंक : ९
  आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस.

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
  आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.देण्याघेण्याचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करावेत. 

 • aajache rashibhavishya monday 29 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : १ 
  काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमीच बोला. 
   
Trending