आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

गुरुवारचे राशिफळ : महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी जुळून येत आहे एक शुभ आणि एक अशुभ योग, जाणून घ्या, तुमच्यासाठी फायदा करून देणारा की नुकसान करणारा राहील दिवस...

दिव्य मराठी

Apr 18,2019 12:00:00 AM IST

गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी हस्त नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्‍याघात आणि हर्षण नावाचा एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगांच्‍या प्रभावामुळे 12 राशींवर विविध परिणाम होतील. व्‍याघात योगामुळे 6 राशींच्‍या लोकांना गुरुवारी अडचणींना सामोरे जावे लागू शकते तर उर्वरित 6 राशींसाठी हा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार..

मेष : तुमचा उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.आनंदी दिवस. शुभरंग: तांबडा| अंक:८वृषभ: आध्यात्मिक मार्गात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. शुभरंग : जांभळा| अंक:९मिथुन : अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अतिहुशार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८कर्क : राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना पैसा कमी पडणार नाही. घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. आज काैटुंबिक जीवनात सलोखा व मधुरता राहील. शुभ रंग : क्रीम| अंक : ५सिंह : आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवेफुगवे असतील. शुभ रंग : सोनेरी | अंक : १कन्या : कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हिताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही. शुभ रंग : पांढरा | अंक : ३तूळ : दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. दिवस लाभाचा असल्याने अाज व्यवसायात एखादे मर्यादित धाडस करायला हरकत नाही. मित्र तुमच्या शब्दाला मान देतील. शुभ रंग : केशरी | अंक : ६वृश्चिक : नोकरीत वरिष्ठ मंडळी खोटी आश्वासने देऊन राबवून घेतील. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल. शुभ रंग : गुलाबी | अंक : २धनू : व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल.चैनी व विलासी वृत्तीवर अंकुश ठेवावा लागेल. मानसिक शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही. शुभ रंग : आकाशी | अंक : ७मकर : भागीदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत. शुभ रंग : राखाडी | अंक : २कुंभ : आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित रहाल. छान दिवस. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात. शुभ रंग : नारिंगी | अंक : ५
X