रिलिजन डेस्क / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

गुरुवार राशिफळ : आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदी व उत्साही, कर्क राशीच्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता

दिव्य मराठी वेब टीम

May 30,2019 12:01:00 AM IST

गुरुवार 30 मे रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारामध्ये नशिबाची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही ठीक राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्य सामंजस्याने वागतील. वास्तु किंवा वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. शुभ रंग : भगवा | अंक : ६वृषभ : रिकाम्या गप्पांत वेळ न दवडता आज तुम्हाला कृतीस प्राधान्य द्यावे लागणार आहे. उच्चपदस्थांच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. अत्यंत व्यस्त दिवस. शुभ रंग : मरून | अंक : ८मिथुन : कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचे दडपण येईल. नास्तिक असाल तरी आज गरजेपुरते अध्यात्मिक व्हाल. संध्याकाळी सत्संगाकडे पाय वळवणे हिताचे राहील. शुभ रंग : पिस्ता | अंक : ७कर्क : काही मनाविरूध्द घटना घडल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कर्जमंजूरीची कामे लांबतील. कायद्यात रहाल तरच फायद्यात रहाल. शुभ रंग : क्रिम | अंक : ४सिंह : वादविवादात समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा हुषार असूही शकते याचे भान असूद्या. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे आज गरजेचे. पत्नीस दिलेली वचने पाळणे हिताचे. शुभ रंग : गुलाबी | अंक : ५कन्या : नोकरीच्या ठीकाणी आज वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. महत्वाकांक्षांना आवर घालून थोडे विश्रांतीस प्राधान्य देणेही गरजेचे आहे. काही येणी वसूल होतील. शुभ रंग :मोरपंखी | अंक : ९तूळ : घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज जास्तीत जास्त वेळ घालवाल. खेळाडू व कलाकार मंडळींना चाहत्यांचे प्रेम लाभेल. शुभ रंग : मोतिया | अंक : ३वृश्चिक : दैनंदीन कामे आज सुरळीत पार पडतील. आज काही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. गृहीणींनी गप्पा आवरत्या घ्याव्यात कारण त्यातूनच गैरसमज होतील. शुभ रंग : पांढरा | अंक : १धनू : आज दैनंदीन कामातही अडथळे संभवतात. घरात पुरेसा वेळ न दिल्याने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शेजारी आपलेपणाने वागतील. व्यस्त दिवस. शुभ रंग : डाळिंबी | अंक : २मकर : खिसे भरलेले असल्याने मित्रमंडळीतही तुमच्या शब्दाला वजन असेल. भावनेच्या भरात कुणाला अश्वासने देणे टाळा. आज वक्ते सभा गाजवतील. शुभ रंग : केशरी | अंक : ३कुंभ : आवक चांगली असल्याने तुमचे मनोबल उत्तम असेल. उद्योग व्यवसायात चढाओढीचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ लाख मोलाची राहील. शुभ रंग : पांढरा | अंक : ८मीन : कंजूषपणा सोडावा लागेल. आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्जाचे हप्ते फेडावे लागणार आहेत. बेरोजगारांची भटकंती चालूच राहणार आहे. शुभ रंग : हिरवा | अंक : १
X
COMMENT