Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 11:03 AM IST

नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  आज सोमवार, दिवसाची सुरुवात अमृत मुहूर्ताने होत आहे. दिशा शूल पूर्वेस असेल तर राहू काळ सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहील. आज विशेष दुर्गाष्टमीचा दिवस आहे. आजच्या दिवशी पूर्वाफाल्गुनि आणि उत्तरफाल्गुनि नावाचे नक्षत्र जुळून येत आहेत. या दोन्ही नक्षत्रांच्या प्रभावामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील दूर होऊ शकतील.

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचे राशिभविष्य...

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : २
  व्यावसायिक उलाढाल वाढेल. शेअर्स बाजारातील तुमचे अंदाज योग्यच ठरतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. यशदायी दिवस.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  वृषभ:शुभ रंग : केशरी | अंक : ७
  बांधकाम व्यावसायिकांसाठी आज विषेश अनुकूल दिवस आहे. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना दिलेले शब्द पाळल. गृहसौख्याचा दिवस.
   
 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ५
  आज काही मनाजोगत्या घटना घडतील. भावंडांतील मतभेद दूर होऊन सलोखा निर्माण होईल. बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
  आज फक्त आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. तुमच्या कामातील व्यस्ततेने आज तुम्हाला कुटुंबियांची नाराजी मात्र पत्करावी  लागेल.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  कर्क: शुभ रंग: हिरवा | अंक : १
  जमेची बाजू जड असून नोकरी धंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. आज वाणीत मृदुता असेल तर अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. वक्तृत्वास वाव मिळेल.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
  आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून आज तुम्ही जी म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.  गृहीणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. दिवस लाभाचा.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
  आज जे काही कराल ते करताना आधी प्रकृतीस जपा. एकावर विसंबून दुसऱ्यास अश्वासने देऊ नका. आज मोठया आर्थिक उलाढाली टाळलेल्याच बऱ्या.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ४
  आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून न घेता आपलेच घोडे पुढे दामटवाल. तुमच्या अतीस्पष्ट बोलण्याने तुमच्याच हितचिंतकांची मने दुखावतील.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ९   
  आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उभी असलेली नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवनांत सौख्य आणि समाधान राहील.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  धनुः शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
  नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक धाडस करावे. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडण्याची शक्यता. संयमाची गरज आहे.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
  खर्च आवाक्या बाहेर जाईल. आज काही दूरचे नातलग  संपर्कात येतील. ज्येष्ठ मंडळींचे अध्यात्मात मन रमेल. पासपोर्ट, वीजा विषयी कामातील अडथळे दूर होतील.

 • aajche rashi bhavishya, 10 june 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : अबोली | अंक : ५
  आज ज्येष्ठ मंडळींनी प्रक़तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्वसनाचे विकार असतील तर विषेश काळजी घ्यायला हवी. आज पैजा जिंकाल.

Trending