Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार

ग्रहस्थितीगामुळे चिंताग्रस्त लोकांना थोडासा दिलासा मिळू शकतो

दिव्य मराठी वेब

Jun 17,2019 12:00:00 AM IST

आज सोमवार 17 जून 2019 रोजी ज्येष्ठा नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. या नक्षत्राच्या प्रभावासह आजच्या दिवशी ज्येष्ठ पोर्णिमा आणि वृषभ पूजनाचा योग देखील जुडून येत आहे. गृहस्थिती आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आजच्या दिवशी वरिष्ठांचा सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. 12 पैकी 8 राशींसाठी आजचा दिवस शुभ राहील. तर उर्वरीत सर्वच राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी नोकरी, कुटुंब, प्रेम आणि व्यवसायासाठी कसा राहील आपला दिवस... सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढी स्लाइड्सवर क्लिक करा...

मेष: शुभरंग- गुलाबी, अंक-५ घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल. संभाषण चातुर्याने बरेच प्रश्न सोडवाल. उद्योगधंद्यात वेळीच योग्य निर्णय फायदेशीर ठरतील. मुले आज तुमच्या मनासारखी वागतील. गृहिणींना आवडता छंद जोपासता येईल.मकरः शुभरंग- जांभळा, अंक-४ आज आर्थिक अडचणींवर तुमची जमेची बाजू चांगली साथ देईल. स्थावराच्या संदर्भातील काही महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागू शकतील. एखादा अाकस्मिक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. आज ऐषआरामाकडे कल राहील.वृश्चिकः शुभरंग- केशरी, अंक-४ आर्थिक आवक मनाजोगती असल्याने आनंदी उत्साही असाल. राशीच्या चतुर्थात चंद्र असल्याने कौटुंबिक जीवनात सामंजस्य असेल. खिशात पैसा खेळता राहील. कुटुंबीयांचे हट्ट आनंदाने पुरवू शकाल. मुले आज्ञा पाळतील.तूळः शुभरंग- निळा, अंक-२ आर्थिक उन्नत्तीचे विविध मार्ग सुचतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. आज व्यवसायात मोठया उलाढाली वेग घेतील. संध्याकाळी प्रियजनांच्या गाठीभेटीत वेळ आनंदात जाईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.कर्कः शुभरंग- मोरपंखी, अंक-१ आपल्या कार्यक्षेत्रात आज सावधपणे पावले उचला. आत्मविश्वासास थोडा लगाम आवश्यक. काही आकस्मिक खर्च दार ठोठावणार आहेत. कुणालाही शब्द देण्याच्या भानगडीत पडूच नका. दानधर्म करण्याआधी शिल्लक तपासा.सिंहः शुभरंग- पिवळा, अंक-९ व्यापारी वर्गाची आवक समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांचे कृपाछत्र असेल. घेतलेल निर्णयही अचूक ठरतील. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. नवविवाहितांची सांसारिक स्वप्ने साकार होतील.वृषभः शुभरंग- सोनेरी, अंक-९. व्यवसायात अाव्हानात्मक स्थिती असेल. हाताखालच्या लोकांवर करडी नजर गरजेची. आज अधिकार गाजवायची संधी मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमचा प्रभाव वाढणार आहे. नवीन व्यावसायिकांनी संयम बाळगावा.कुंभः शुभरंग- अबोली, अंक-६ नोकरी, व्यवसायात कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही तितकाच असल्याने तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. आर्थिक अडचणी काढता पाय घेतील. चैनीसाठी खर्च होणार आहे.कन्याः शुभरंग- भगवा, अंक-७ फार काबाडकष्ट न करता थोडं स्मार्ट वर्क करण्याचा तुम्ही विचार कराल. एखादा जुना अाजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, सतर्क राहा. काहीजणांना क्षुल्लक कारणावरून जोडीदाराचा रुसवा सहन करावा लागेल.मिथुनः शुभरंग- चंदेरी, अंक-५. धार्मिक कार्यातील सहभागाने मन प्रसन्न राहील. उद्योग धंद्यात जीवघेणी स्पर्धा राहील. तुमच्या संयमाची परीक्षा असेल, गुरुतुल्य व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन कामी येईल. उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी.धनूः शुभरंग- पिवळा, अंक-३ आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. उगीचच एखाद्या गोष्टीचा त्रागा कराल. लहरी स्वभावामुळे आज तुमचे काही हितचिंतक दुखावले जण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कारणाने कदाचित मातोश्रींचीही नाराजी ओढावून घ्याल.मीनः शुभरंग- स्ट्रॉबेरी, अंक-८ दगदग वाढली असली तरीही आता माघार नको, स्वप्नपूर्ती जवळच आहे. अधिकारी वर्ग टूरवर असण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षणार्थींना परदेश गमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. ज्येष्ठ मंडळी धार्मिक स्थळी भेटी देतील.

मेष: शुभरंग- गुलाबी, अंक-५ घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल. संभाषण चातुर्याने बरेच प्रश्न सोडवाल. उद्योगधंद्यात वेळीच योग्य निर्णय फायदेशीर ठरतील. मुले आज तुमच्या मनासारखी वागतील. गृहिणींना आवडता छंद जोपासता येईल.

मकरः शुभरंग- जांभळा, अंक-४ आज आर्थिक अडचणींवर तुमची जमेची बाजू चांगली साथ देईल. स्थावराच्या संदर्भातील काही महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागू शकतील. एखादा अाकस्मिक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. आज ऐषआरामाकडे कल राहील.

वृश्चिकः शुभरंग- केशरी, अंक-४ आर्थिक आवक मनाजोगती असल्याने आनंदी उत्साही असाल. राशीच्या चतुर्थात चंद्र असल्याने कौटुंबिक जीवनात सामंजस्य असेल. खिशात पैसा खेळता राहील. कुटुंबीयांचे हट्ट आनंदाने पुरवू शकाल. मुले आज्ञा पाळतील.

तूळः शुभरंग- निळा, अंक-२ आर्थिक उन्नत्तीचे विविध मार्ग सुचतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. आज व्यवसायात मोठया उलाढाली वेग घेतील. संध्याकाळी प्रियजनांच्या गाठीभेटीत वेळ आनंदात जाईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

कर्कः शुभरंग- मोरपंखी, अंक-१ आपल्या कार्यक्षेत्रात आज सावधपणे पावले उचला. आत्मविश्वासास थोडा लगाम आवश्यक. काही आकस्मिक खर्च दार ठोठावणार आहेत. कुणालाही शब्द देण्याच्या भानगडीत पडूच नका. दानधर्म करण्याआधी शिल्लक तपासा.

सिंहः शुभरंग- पिवळा, अंक-९ व्यापारी वर्गाची आवक समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांचे कृपाछत्र असेल. घेतलेल निर्णयही अचूक ठरतील. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. नवविवाहितांची सांसारिक स्वप्ने साकार होतील.

वृषभः शुभरंग- सोनेरी, अंक-९. व्यवसायात अाव्हानात्मक स्थिती असेल. हाताखालच्या लोकांवर करडी नजर गरजेची. आज अधिकार गाजवायची संधी मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमचा प्रभाव वाढणार आहे. नवीन व्यावसायिकांनी संयम बाळगावा.

कुंभः शुभरंग- अबोली, अंक-६ नोकरी, व्यवसायात कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही तितकाच असल्याने तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. आर्थिक अडचणी काढता पाय घेतील. चैनीसाठी खर्च होणार आहे.

कन्याः शुभरंग- भगवा, अंक-७ फार काबाडकष्ट न करता थोडं स्मार्ट वर्क करण्याचा तुम्ही विचार कराल. एखादा जुना अाजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, सतर्क राहा. काहीजणांना क्षुल्लक कारणावरून जोडीदाराचा रुसवा सहन करावा लागेल.

मिथुनः शुभरंग- चंदेरी, अंक-५. धार्मिक कार्यातील सहभागाने मन प्रसन्न राहील. उद्योग धंद्यात जीवघेणी स्पर्धा राहील. तुमच्या संयमाची परीक्षा असेल, गुरुतुल्य व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन कामी येईल. उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी.

धनूः शुभरंग- पिवळा, अंक-३ आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. उगीचच एखाद्या गोष्टीचा त्रागा कराल. लहरी स्वभावामुळे आज तुमचे काही हितचिंतक दुखावले जण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कारणाने कदाचित मातोश्रींचीही नाराजी ओढावून घ्याल.

मीनः शुभरंग- स्ट्रॉबेरी, अंक-८ दगदग वाढली असली तरीही आता माघार नको, स्वप्नपूर्ती जवळच आहे. अधिकारी वर्ग टूरवर असण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षणार्थींना परदेश गमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. ज्येष्ठ मंडळी धार्मिक स्थळी भेटी देतील.
X
COMMENT