Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

Daily Horoscope / आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 21, 2019, 12:00 AM IST

12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील दिवसाची सुरुवात

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  रविवार, 21 जुलै रोजी शततारका नक्षत्राच्या प्रभावाने एक शुभ योग जुळून येत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे धनलाभ आणि आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अनेकांचा अडकलेला पैसा आज परत मिळू शकतो. तर काहींना ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक फायद्याचे प्लॅन आज करू शकतील. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष लाभ देणारा तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरेल...

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, असा राहील आजचा दिवस...

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ 
  आज तुमचे मनोबल कमीच असेल. मनाच्या द्विधा अवस्थेत महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज धाडस टाळा.

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : राखाडी | अंक : ३
  तुमच्यासाठी सगळा दिवस अनुकूल आहे. तुमचे कार्यक्षेत्रातील महत्व वाढेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विरोधकही तुमचे वर्चस्व मान्य करतील. 

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  कर्क :  शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
  कुटुंबातील सदस्यांत सामंजस्य राहील. नवोदीत कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. खेळाडू स्पर्धा गाजवतील. गृहीणी आज स्वत:साठी वेळ काढतील.  
   
 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
  आज वैवाहीक जिवनांतील काही जुन्या स्मृती मनास आनंद दंतील. व्यवसायांत भागिदारांशी सामंजस्य राहील. सकारात्मकतेने नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. 

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : नारिंगी | अंक : २
  आज काहीशी आक्रमक वृत्ती राहील. तुमच्यात उच्च प्रतीचा आत्मविश्वास राहील. इतरांपेक्षा काही वेगळेच करून दाखवायची उमेद असेल. अती धावपळ टाळा.

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
  नेहमीची कामे सुरळीत पार पडतील. प्रापर्टी विषयी रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रेमप्रकरणे मात्र गोत्यात आणतील.

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : तांबडा | अंक : ४
  चांगली माणसे संपर्कात येतील. नव्या योजना उत्तम प्रकारे राबवता येतील. आज कामगारांना केलेल्या कष्टांचा योग्य मोबदला मिळेल. यशदायी दिवस. 

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
  कामाच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. रूग्णांनी पथ्यपाणी पाळावे.

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७
  आज तुम्ही कुठेही आपलेच खरे करायचा प्रयत्न कराल. स्पष्टवक्तेपणा मुळे काही नाती दुरावतील. घराबाहेर वावरताना वाणीत गोडवा असणे अत्यंत गरजेचे अाहे. 

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
  आज घराबाहेर वादविवादात सामंजस्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज रागावर ताबा हवा.

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ५    
  नोकरीच्या ठीकाणी पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळवून देणारा  दिवस अाहे. वरीष्ठ  तुमच्यावर  खूष  असतील. बढतीच्या  मार्गातील अडथळे आता दूर  होतील.

 • Aajche rashi bhavishya 21 July 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ९ 
  आज मनांत काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. घरातील थोरांचे विचार समजून  घ्यावे लागतील. तुम्हाला एकांत हवासा वाटेल. 

Trending