Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 29, 2019, 12:00 AM IST

12 पैकी 3 राशींसाठी आजचा दिवस खास ठरू शकतो

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  सोमवार, 29 जुलै रोजी दिवसाची सुरुवात अमृत शुभ मुहूर्ताने होत आहे. सकाळी राहू काळ 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहील. आजच्या दिवशी मृग आणि आर्द्रा नावाच्या नक्षांचा योग जुळून येत आहे. एकूणच ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने 12 पैकी 9 राशींसाठी दिवस सामान्य तर उर्वरीत राशींसाठी खास ठरू शकतो. आजच्या दिवशी अडकलेला पैसा पुन्हा मिळू शकेल. तर वरिष्ठांच्या आशीर्वाद आणि सल्ल्याने आजच्या दिवशी नव्या कामाला सुरुवातही करू शकता.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी असा राहील सोमवार

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : २
  नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील. ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
  व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून   स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना तत्परतेने मदत कराल.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ३
  तुमच्या वागण्यात इरांना हट्टीपणा जाणवेल. स्वत:चेच  खरे करण्याकडे  तुमचा कल राहील. तुमच्याकडून आज काही आपलीच माणसे दुखावली जातील.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ६
  काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. 

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ८                                                             आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
  आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ३
  कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळणार  आहे. अध्यात्मिक मार्गात असाल तर उपासनेचे हमखास फळ मिळेल.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ४
  आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  धनू :  शुभ रंग : राखाडी | अंक : ७
  आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  मकर : शुभ रंग : तांबडा | अंक : २
  काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
  पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.

 • aajche rashi bhavishya, 29 July daily horoscope in marathi, divya marathi

  मीन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
  आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे घात करतील.

Trending