Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

Daily Horoscope / आजचे राशीभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 08, 2019, 12:00 AM IST

काही राशींसाठी आजचा दिवस धावपळ आणि व्यस्ततेचा ठरू शकतो...

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  8 जुलै 2018 रोजी दिवसाची सुरुवात अमृत शुभ मुहूर्तात होत आहे. या दिवशी उत्तरा आणि हस्त नावाच्या नक्षत्रांचा योग जुळून येत आहे. ग्रह आणि ताऱ्यांच्या प्रभावामुळे आज 12 पैकी 9 राशींसाठी दिवस धावपळ आणि कामाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना आज दांडी मारण्याचा मूड होऊ शकतो. वडिलधारे व्यक्ती आपली मते लादण्याचा प्रयत्न करू शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांकडून आज सहकार्य मिळण्याचा योग आहे. एकूणच सर्व राशींसाठी कसा राहील आजचा दिवस हे पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ५
  कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : २
  कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
  आज तुमचा ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा. 

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ३                                                              
  आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील. 

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग :अबोली |अंक : १
  पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : मोरपंखी |अंक : ४
  स्वभावातील अहंकारामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत जरा गोडवा ठेऊनच विरोधकांनाही आपलेसे करून घेता येईल.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
  कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील. 

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ७
  सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. शत्रू पळ काढतील.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : निळा | अंक : ८
  नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ३
  घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी  मानसिक  स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६
  मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज एखाद्या विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. स्पर्धकांना कमजोर समजू नका.

 • Aajche rashi bhavishya 8 july 2018 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : मरून | अंक : २
  व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही  जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

Trending