Rashi / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस विशेष फळ देणारा ठरू शकतो

Sep 06,2019 12:00:00 AM IST

शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा राहील. काहींना आजच्या दिवशी प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. जोडीदाराची साथ मिळेल. तसेच कुटुंबियांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. लहानग्यांनी वरिष्ठांच्या सल्ल्यावर दुर्लक्ष करता कामा नये. कुटुंब आणि व्यवसायात व्यस्त राहू शकता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असा राहील राशिनुसार तुमचा दिवस...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ९ कार्यक्षेत्रात काही कटकटींना तोंड द्यावे लागणार आहे.नोकरीत अधिकाऱ्यांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. आज तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्या.वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ७ वैवाहीक जिवनांत जोडीदाराशी चांगले सुर जुळतील. काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आज स्वार्थ साधण्यासाठी काही कामे निस्वार्थीपणे करावी लागतील.मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ ध्येय प्राप्तीची ओढ लागेल परंतू तब्येतीकडे दुर्लक्ष महागात पडेल. मातुल घराण्याकडून काही महत्वाचे समाचार येतील. आज येणी वसूल होण्याची शक्यता.कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ फारच स्वछंदीपणे वागण्याकडे तुमचा कल राहील. तरूण मंडळींना बंधने नकोशी वाटतील. आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. नितीमत्तेचे भान गरजेचे.सिंह : शुभ रंग :पांढरा | अंक : ६ दुनियादारी बाजूला ठेऊन कुटुंबास कसा वेळ देता येईल ते बघावे लागेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गृहीणींसाठी व्यस्त दिवस.कन्या : शुभ रंग : आकाशी |अंक : ४ कौटुंबिक कटकटींना तोंड द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रयत्नांत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील. झाकली मुठ झाकलीच ठेवा.तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ३ आपल्या कतृत्वास पाठींबा देणारी माणसे भेटतील. आज गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे करून घ्याल. पैशाची आवक पुरेशी असल्याने थोडीफर चैनही कराल.वृश्चिक : शुभ रंग : अबोली |अंक : १ खर्चाचे प्रमण वाढेल पण पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. घरतील थोरांची मने जपावी लागतील.मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. घर खरेदी, वाहन खरेदी सारखी स्वप्ने साकार होणार आहेत. आज अती प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.धनू : शुभ रंग : पिवळा | अंक : २ व्यावसायिक मंडळी अधिक गुंतवणूकीस प्राधान्य देतील. नोकरीत अधिकारी वर्गास दूरचे प्रवास घडतील. आज पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील.कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : २ आज फक्त आपण व आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्वाच्या असतील. आज आपले तेच खरे करण्याचा तुमचा अट्टहास राहील.मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३ नोकरदारांनी आज वरिष्ठांच्या होला हो करून दिवस ढकलावा. अती खोलात शिरल्याने अडचणी वाढतील.आज वडीलधारी मंडळी तुमच्या हिताचेच सल्ले देतील.
X