Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार

12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस लाभ देणारा ठरू शकतो

दिव्य मराठी

Aug 12,2019 12:00:00 AM IST

सोमवार, 12 ऑगस्ट रोजी पूर्वाषाढा नावाचा नक्षत्र आणि शुक्र ग्रहाच्या प्रभाव आहे. या ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे एक शुभ योग जुळून येत आहे. त्यामुळे आज बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ९ उद्योग व्यवसायातील पूर्वीचे कष्ट कारणी लागतील.आपल्या कतृत्वास थोरामोठयांचे अशिर्वाद लाभतील.गृहीणींना मात्र उसंत मिळणे कठीण. दगदीचा दिवस.वृषभ : शुभ रंग : भगवा | अंक : ३ स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य दिलेत तर दैव हात जोडून उभे राहील. कर्तव्यपूर्तीचा आनंद घेता येईल.आज नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परीस्थितीशी झुंज द्याल. पत्नी जे म्हणेल त्याला हो बोलून मोकळे व्हा. आज सासूरवाडीकडून काहीतरी धनलाभ संभवतो.कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ६ आज विनाकारण इतरांच्या भानगडीत डोकवायचा मोह होईल. पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे राहील. आपला स्वार्थ साधून घ्या.सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : २ स्वावलंबन कामी येईल. कौटुंबिक जिवन सौख्यपूर्ण राहील. मातुल घराण्याकडून सुवार्ता येतील. आज जोडीदाराकडून मात्र फार अपेक्षा नकोत.कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ व्यापऱ्यांची बाजारातील पत वाढेल. नोकरीच्या ठीकाणी कामातील निष्ठेने वरीष्ठांचे मन जिंकाल. काही वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडाल. यशदायी दिवस.तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ५ वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे नियोजन यामुळे कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग प्रशस्त हाईल. जागेसंबंधी महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील. मातोश्रींकडून धनलाभ.वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७ सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या मानसन्मानात वृध्दी होईल. नवे परिचय फायद्याचे ठरतील. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. कायद्याचे पालन गरजेचे.धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : १ मनी योजाल ते तडीस न्याल. वादविवादात सरशी होईल. पतप्रतिष्ठा वाढून कौटुंबिक जिवनांतही सौख्याचे क्षण अनुभवाल. हितशत्रू पळ काढतील.मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ मनाच्या लहरीपणास आवर घालून आज संयमाने वागणे गरजेचे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. महत्वपूर्ण चर्चा सफल होतील.कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ८ काहीसा संमिश्र फळे देणारा दिवस. आवक जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. जोडीदाराची मतेही समजून घेणे गरजेचे अाहे.मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : २ आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस असून बरीचशी अवघड कामे सोपी होणार आहेत. मित्रमंडळींच्या गाठीभेटींनी आज संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.
X