Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

Daily Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 20, 2019, 12:00 AM IST

ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशींसाठी खास आहे आजचा दिवस

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  शनिवार, 20 जुलै रोजी शततारका नावाचा नक्षत्र येत आहे. शुभ योगात होणारी दिवसाची सुरुवात आणि ग्रह-ताऱ्यांच्या परिस्थितीमुळे 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. तर उर्वरीत 4 राशींसाठी दिवस सामान्य राहील. नवीन कामाची आखणी करू शकाल, अडकली कामे पूर्ण होऊ शकतील, तसेच काही लोकांच्या बाबतीत आजचा दिवस आर्थिक लाभाचा ठरू शकतो. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आपल्या राशीसाठी असा राहील आजचा दिवस...

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
  आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील.हौसमौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्रमै़त्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४
  आज रिकामटेकडया गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७                                                               
  उद्योग व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल, नवे हितसंबंध तयार होतील. इतरांना दिलेले शब्द पाळू शकाल. प्रवासात आपल्या वस्तूंची  काळजी घ्या.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ६
  आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येणार आहेत.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
  मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. विरोधकांना व स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. धाडसाची कामे टाळा.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
  आज व्यवसायातील आर्थिक उलाढाली भागिदारांना विश्वासात घेऊनच करा. वैवाहीक जिवनांत गोडवा असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. 

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : तांबडा | अंक : १
  बराच काळ रखडलेल्या घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावेच लागणार आहे. वाहन खरेदीची कामे मार्गी लागतील.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग :जांभळा |अंक : २                 
  आज केवळ मोठेपणासाठी  न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. मागून नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा. आज तुमची तब्येत जरा नरमच राहील.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : केशरी | अंक : ८
  काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. घरातल्या थोर मंडळींचेही उपदेश ऐकून बोअर व्हाल. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९                                        
  कंजूषपणा बाजूला ठेऊन आज काही अवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील, सतर्क रहा.  मित्रांना पार्टी आज नको.

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ३                          
  आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. बराच वेळ घराबाहेरच जाईल. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा. वादविवाद टाळावेत. 

 • aajche rashi bhavishya saturday 20 July 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : मरून | अंक : १
  नोकरीच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला जाणवेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. तरूणांनी  कुसंगत  टाळावी. व्यसने घात करतील.

Trending