आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या आपल्या राशीनुसार कसा राहील आजचा रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 3 नोव्हेंबर रोजी दिवसाची सुरुवात पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये होत आहे. पूर्वाषाढा आणि श्रवण नक्षत्राच्या योगाने आजचा दिवस 12 पैकी 9 राशींसाठी विशेष फळ देणारा राहील. तर उर्वरीत 3 राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल. राशिनुसार, जाणून घ्या आपल्यासाठी कसा राहील आजचा दिवस...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी आश्वासने देतील.कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : २
व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल.चैनी व विलासी वृत्तीवर अंकुश ठेवावा लागेल. मानसिक  शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : २
भागीदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.


कर्क :  शुभ रंग : क्रिम | अंक
: ३
आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित राहाल. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : तांबूस | अंक : १
कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९
उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. आनंदी दिवस.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
अध्यात्मिक  मार्गात  प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अती हुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ४
राशीच्या धनस्थानेतून चंद्राचे भ्रमण सुरु असताना आज पैशाची कमतरता पडणार नाही. घर सजावटीसाठी खर्च कराल कौटुंबिक सदस्यांमध्ये सलोखा व सामंजस्य असेल.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहिक जीवनात लाडीक रूसवे-फुगवे चालायचेच.

कुंभ : शुभ रंग : पिवळा | अंक : ३
कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हिताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
दैनंदिन कामे सुरळीत पार पडणार आहेत. दिवस लाभाचा असल्याने व्यवसायात एखादे धाडस करायला हरकत नाही. आप्तस्वकियांत तुमच्या शब्दाला मान राहील.

बातम्या आणखी आहेत...