आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकेतील लीड चाइल्ड आर्टिस्ट 'कुल्फी'ने 72 वर्षीय महिलेची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे. 'कुल्फी'चे खरे नाव आकृती शर्मा आहे. झाले असे की, मुंबईतील बोरिवली भागात राहणा-या 73 वर्षीय एलिझाबेथ या चिमुकल्या आकृतीच्या मोठ्या फॅन आहेत. एलिझाबेथ यांना दोन मुली आहेत. त्यांच्या शेजारी जागृती यांनी दैनिकभास्करला सांगितले की, ''एलिझाबेथ आंटी यांना हाय डायबिटिज आहे. अलीकडेच त्या घरात बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांना आम्ही तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे पोहोचल्यानंतर एलिझाबेथ शुद्धीवर आल्या आणि त्यांनी त्यांची अखेरची इच्छा व्यक्त केली. सहसा लोक शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या मुलांना भेटू इच्छितात. पण एलिझाबेथ यांनी टीव्ही कलाकार आकृती शर्मा हिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.''
जागृती यांनी पुढे सांगितले, 'आपल्या मुलींना भेटण्याऐवजी आंटींनी टीव्ही आर्टिस्टला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने आम्ही आश्चर्यचकित झालो. पण आकृती हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी आमच्याकडे फारसा वेळ नव्हता. म्हणून आंटींची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ कॉलवर आम्ही आकृतीसोबत त्यांचे बोलणे करुन दिले. आंटी अतिशय आनंदी झाल्या.' एलिजाबेथ यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आकृतीने आंटीच्या चेह-यावर फुलवले हास्य..
एलिझाबेथ आंटीसोबत बोलणे झाल्यानंतर आम्ही आकृतीची प्रतिक्रिया जाणून घेतली. आकृती म्हणाली, ''आंटीसोबत बोलत असताना मला रडू कोसळले. पण सोबतच माझा एवढा मोठा फॅन असल्याचे समजल्यावर आनंदही झाला. मी आंटींना जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहे.''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.