आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आमची परिवहन'चा प्रवास लवकरच महागणार: तिकीट दरवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महापालिकेकडून शहरात चालवल्या जाणाऱ्या आमची परिवहनने प्रवास करणे आता महागणार आहे. शहर बसच्या तिकीटांमध्ये वाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (२१ नोव्हेंबर) शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापालिका क्षेत्रात शहरांतर्गत वाहतुकीकरिता शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने अमरावती ते बडनेरा दरम्यान शहर बस फेऱ्यांमध्ये कपात केली होती. त्यामुळे राज्य परिवहन विभागाची सेवा पूर्णपणे बंद करीत महापालिकेकडून आमची परिवहन या नावाने शहर बस सेवा बारा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. अद्याप ही बडनेरा रेल्वे स्टेशन ते अमरावती बसस्थानक या मुख्य मार्गाने सर्वाधिक शहर बस धावते. नवसारी आणि विद्यापीठ मार्ग सोडला तर अद्याप ही अनेक नवीन मार्गावर शहर बस सुरू करण्यात आलेली नाही. असे असताना देखील शहर बस सेवेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

 

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १ मार्च २०१४ पासून सुधारित तिकीटांचे दरपत्रकास मंजुरी प्रदान केल्यानुसार आयतागायत त्याच दराने तिकीट विक्री केल्या जात आहे. मनपात नवीन कंत्राटदारामार्फत २५ मे २०१६ पासून शहर बस उपक्रम सुरू करण्यात आला. शहर बस सेवा उपक्रम सुरू होतेवेळी डिझेलचे दर ५७.४७ रुपये प्रती लीटर असे होते. मात्र, सद्यस्थितीत डिझेलचे दर ७६.१३ रुपये प्रती लीटर आहे. त्या तुलनेत प्रती लीटर २० रुपये वाढ झाली अाहे. वाहनाचे टायर, ट्युब, सुटे भाग, विमा यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. राज्य परिवहन विभागाने देखील तिकीट दरात १८ टक्के वाढ केली असून रेल्वेने प्रवास भाडे वाढविले आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचना २५ डिसेंबर २००५ अन्वये कमाल व किमान प्रवासी भाडे ठरविण्यात आले असून त्यानुसार सुधारित प्रवासी भाडे दरपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यास आमसभेत मंजूरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच अंमलबजावणी होणार आहे.


अशी आहे दरवाढ (रुपयांत)किमी पर्यंत जुने नवीन
० ते २ -७.०० ८.००
२ ते ४ -९.०० १०.००
४ ते ६ - ११.०० १३.००
६ ते १०- १४.०० १५.००
१० ते १४- १६.०० २०.००
१४ ते १८ - १८.०० २५.००
१८ ते २२- १९.०० २८.००

बातम्या आणखी आहेत...