आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'2.0\'मध्ये रजनीकांतऐवजी आमिर खानला घेणार होते मेकर्स, पण त्याने मान्य केले नाही, स्वतः सांगितले भूमिका नाकारण्याचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर मूव्ही '2.0' रिलीज झाला आहे. या चित्रपटातून अक्षयने साउथ इंडियन चित्रपटात डेब्यू केला आहे. चित्रपाटात तो एका पक्षीमानवाच्या भूमिकेत आहे. पण अक्षयने हा चित्रपट साइन करण्यापुर्वी अनेक अॅक्टर्सने ही भूमिका नाकारली होती. एवढेच नाही तर एका बॉलिवूड सुपरस्टारने तर रजनीकांतची भूमिका करण्यासही नकार दिला होता. 

 

कुणाला ऑफर झाला होता रजनीकांतचा रोल 
- रजनीकांत यांची भूमिका सुपरस्टार आमिर खानला ऑफर करण्यात आली होती. स्वतः आमिर खानने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, "मी डायरेक्टर शंकर आणि रजनी यांचा खुप मोठा फॅन आहे. शंकरने हा चित्रपट मला ऑफर केला होता. एवढेच काय तर रजनीकांतनेही मला फोनवर फिल्म कर असे सांगितले होते. स्क्रिप्ट खुप छान आहे. चित्रपट खुप चालेल. पण मी जेव्हा माझे डोळे बंद केले तेव्हा मला त्या भूमिकेत रजनी सर दिसले. तेव्हा मी हा रोल करणार नाही असे शंकरला सांगितले. हा चित्रपट फक्त रजनी सरच करु शकता. त्यांना कुणीही रिप्लेस करु शकत नाही."


 

 

 

बातम्या आणखी आहेत...