आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Apologises For Failing To Entertain With Thugs Of Hindostan Says Will Try Harder Next Time

आमिर खानने स्विकारली 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' फ्लॉप झाल्याची जबाबदारी, म्हणाला - पुढच्या वेळी यापेक्षा जास्त मेहनत घेऊ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आमिर खानने  'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट अपयशी ठरल्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असे म्हटले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सपशेल अपयशी ठरला, असेही तो म्हणाला आहे. खरं तर या चित्रपटाकडून आमिरसह प्रेक्षकांनाही मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाला लोकांनी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ अशी मोठी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट तिकिटबारीवर चांगलाच आपटला. 

 

या सगळ्या अपयशानंतर पहिल्यांदाच आमिर खानने या चित्रपटाच्या अपयशाची सगळी जबाबदारी माझी असल्याचे म्हटले आहे. मुंबईत स्क्रिप्ट राइटिंग संदर्भातला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमिरला 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'  फ्लॉप झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमिरने हा चित्रपट पडल्याची जबाबदारी माझी असल्याचे म्हटले आहे. लोकांनी माझ्या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या होत्या मात्र मी त्या पूर्ण करू शकलो नाही हे माझे अपयश आहे. पुढच्या वेळी याहून अधिक मेहनत घेऊन चांगली कलाकृती प्रेक्षकांसाठी आणणार असल्याचेही आमिर म्हणाला. 

 

चित्रपट अपयशी ठरला, यात वाद नाही तरीही काही लोकांना तो आवडला, ज्यांना तो आवडला त्यांचे मी आभार मानतो मात्र लोकांनी माझ्या चित्रपटाकडून  खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या मी पूर्ण करू शकलो नाही याचे मला वाईट वाटते आहे. जे अपयश आले त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असे आमिर म्हणाला.  'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. चित्रपटाने आतापर्यंत फक्त 150 कोटींचा गल्ला जमवला आहे. दक्षिण भारतातल्या कमाईनंतर हे आकडे समोर आले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...