पंजाब / शूटिंगमधून ब्रेक घेऊन सुवर्ण मंदिरात पोहोचला आमिर खान, गुरुद्वारा कमिटीने सांगितले, 'हरी सिंह नलवा यांच्यावर चित्रपट बनवावा'

आमिर म्हणाला, येथे येऊन समाधान मिळते, चित्रपटाबद्दलही फॅन्ससोबत बातचीत केली 

Dec 01,2019 11:52:00 AM IST

अमृतसर : अभिनेता आमिर खानने सचखंड श्री हरमंदिर साहेब येथे पोहोचून दर्शन घेतले. आमिर खान म्हणाला की, त्याला येथे येऊन खूप समाधान मिळते. आणि तो तिसऱ्यांदा येथे आला आहे. आपला आगामी चित्रपट लाल सिंह चड्‌ढा बद्दल आमिर खान म्हणाला की, तो शीख पात्र साकारत आहे जो खूप स्वच्छ हृदयाचा माणूस आहे आणि त्याच्या मनात कधीही नकारात्मक विचार येत नाही. त्याने सांगितले की, हा चित्रपट इंग्रजी फॉरेस्ट गम्पचा रिमेक आहे.

येथे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे महासचिव डॉक्टर रूप सिंहने त्याला सन्मानित केले आणि त्यांना आग्रह केला की, त्याने शीख जनरल हरी सिंह नलवा यांच्यावर चित्रपट बनवावा. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार आमिर खानने आपला आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' मधील आपला लूक जारी केला होता. अभिनेत्याने ट्विटरवर आपला परिचय देत पोस्टर जारी करून लिहिले, "सत श्री अकाल जी, मी लाल सिंह चड्ढा."

रिपोर्ट्सनुसार, 'लाल सिंह चड्ढा' मध्ये भारत पाक वॉर आणि इमर्जन्सीदरम्यानचे सीन्स दाखवले जातील. तसेच आमिरसोबत या चित्रपटात करिना कपूरदेखील दिसणार आहे. हे तिसऱ्यांदा आहे. यापूर्वी करिना, आमिरसोबत '3 इडियट्स' आणि 'तलाश' मध्ये दिसले होते, दोघांची जोडी असलेला 'लाल सिंह चड्ढा' पुढच्यावर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे. या चित्रपटात इमर्जन्सी पीरियड, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या यांसारख्या घटनादेखील दाखवल्या जातील. चित्रपटात आमिर तरुण रूपात दिसणार आहे. यासाठी त्याने आपले 12 ते 14 किलो वजन कमी केले. याव्यतिरिक्त आमिरकडे आणखी एक चित्रपट आहे. आमिर तमिळ चित्रपट 'विक्रम वेदा' मध्ये दिसणार आहे.

X