आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर-शाहरुखने ओलांडली आहे पन्नाशी तरीही दिसतात फिट अँड यंग, आमिर खानने बदलला डायट प्लान, शाहरुख बनवणार 21 वर्षांच्या तरुणाप्रमाणे बॉडी, कमी करणार वजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आमिर खान सध्या फिटनेस फ्रीक बनला आहे. पुढच्या चित्रपटासाठी त्याला स्लिम आणि यंग दिसायचे आहे. यामुळे तो स्ट्रिक्ट डायट फॉलो करतोय. आमिर स्ट्रिक्ड डायट फॉलो करतोय हे त्याने मीडियासोबत बोलताना नुकतेच सांगितले. आमिर खान 'फॉरेस्ट गम्प' च्या हिंदी रीमेकमध्ये टॉम हँक्सची भूमिका साकारणार आहे अशा चर्चा आहेत. सूत्रांनुसार, आमिरजवळ अनेक प्रोजेक्ट्स आहेत, पण तो 1994 चा हॉलिवूड क्लासिक चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' वर तात्काळ काम सुरु करणार आहे. आमिर खान प्रोडक्शनने गेल्यावर्षी पारामाउंट पिक्चर्सकडून चित्रपटाचे अधिकार खरेदी केले होते. फॉरेस्ट गम्पमध्ये टॉम हँक्सला लांब लांब पायी चालताना दाखवले आहे. या भूमिकेत आमिरला स्लिम आणि यंग दिसायचे आहे यामुळे तो स्ट्रिक्ट डायट प्लान फॉलो करतोय. आमिरचे पूर्व मॅनेजर अद्वेत चंदन हा चित्रपट डायरेक्ट करु शकतात. याच काळात आमिर 'महाभारत' या चित्रपटाच्या तयारीत आहे. 

 

पुढच्या चित्रपटात 21 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार शाहरुख 
- शाहरुख खान आपल्या करिअरची सर्वात कठीण भूमिका करण्यासाठी तयार आहे. इंडियन एयरफोर्स पायलट राकेश शर्मा यांची ही भूमिका आहे. ते अंतराळात प्रवेश करणारे पहिले भारतीय आहेत. या पात्राप्रमाणे दिसण्यासाठी शाहरुख वजन कमी करणार आहे. त्याला या चित्रपटात 21 वर्षांच्या राकेश शर्मासारखे दिसायचे आहे. 


- सूत्रांनुसार, 'सारे जहां से अच्छा' असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये राकेश शर्माचा पायलट ते इंडियन एयरफोर्स जॉइन करण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या भूमिकेत फिट बसण्यासाठी शाहरुख वजन कमी करणार आहे. यामुळे तो स्लिम आणि तरुण दिसू शकेल. 
- शाहरुखला आपल्या लीन लूकसाठी VFX वर अवलंबून राहायचे नाही. त्याला खरोखर स्लिम आणि तरुण दिसायचे आहे. यामुळे स्ट्रिक्ट डायट फॉलो करतोय. 

 

नव्या पिढीच्या दिग्दर्शकांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा : शाहरुख 
- वाढते वय हे शाहरुख खानसाठी अडचण नाही. तो नेहमीप्रमाणे व्यस्त असतो. त्याच्या वयामुळे त्याच्या कामात काहीच फरक पडलेला नाही. 
- शाहरुख म्हणतो, "मी जे काही करतोय त्यामुळे आनंदी आहे. माझे गोड मुलं आहेत. त्याच्यासोबत वेळ घालवायला मला खुप आवडते. यासोबतच माझ्या आयुष्यात अजून चांगले लोक आहेत. मी विचार करायचो की, मी आता पन्नासचा आहे आणि खुप काही केले आहे. पण येथे नवीन डायरेक्टर्सची फौज आहे, हे सर्व माझ्यासोबत काम करण्यासाठी एक्सायटेड आहेत."
- "डायरेक्टर्स मलाही खुप एक्सायडेट करतात. यामुळे एक अॅक्टर म्हणून मी काही गोष्टी नव्या पध्दतीने करु शकतो. जसे मी 25 वर्षांपुर्वी केले होते. मी दिग्दर्शकांसाठी माध्यम आहे. जर डायरेक्टर्सकडे नवीन विचार असेल तर मी त्यांचे माध्यम बनू शकतो आणि यातून मला खुप आनंद मिळतो."

 

 

 

बातम्या आणखी आहेत...