आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानजवळ आहेत 150 कोटींचे 3 बंगले, एकाच गावात आहेत 22 घरं, आहे लग्झरी कारचे कलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट यावर्षी 7 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटात आमिर आझाद नावाच्या ठगची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 210 कोटी आहे. आमिरच्या चित्रपटाचे बजेट काहीही असो, त्याचे चित्रपट बजेटच्या कितीतरी पटीने कमाई करत असतात. आमिर खानच्या प्रॉपटीविषयी बोलायचे झाल्यास, नेटवर्दियरनुसार तो 180 मिलियन डॉलर (1300 कोटी रुपये) चा मालक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 143 कोटींच्या जवळपास आहे. 


बॉलिवूडच्या आणखी दोन खान मंडळींप्रमाणे आमिरही लग्झरी लाइफस्टाइल जगतो. त्याची फीस सलमान आणि शाहरुखच्या तुलनेत कमी असली तरी तो चित्रपटाच्या प्रॉफिट शेयरिंगमध्ये मोठा भाग घेत असतो. आमिरजवळ अमेरिकेतील बेवर्ली हिल्समध्ये 75 कोटींचा बंगला आहे. याशिवाय मुंबईतील फ्रीडा अपार्टमेंटमध्ये 65 कोटींचा फ्लॅट आहे. याशिवाय अनेक लग्झरी गोष्टी त्याच्याजवळ आहेत. 

 

पाचगनीमध्ये 15 कोटींचा बंगला, तर वडिलोपार्जित गावात आहेत 22 घरं...
लग्झरी बंगल्यांविषयी सांगायचे म्हणजे, आमिरजवळ पाचगनी (महाराष्ट्र) मध्ये सुमारे 15 कोटींचा बंगला आहे. आमिर त्याच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत कायम येथे येत असतो. येथेच तो त्याचा वाढदिवसही साजरा करतो. याशिवाय यूपीच्या हरदोईपासून 40 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शाहाबादमध्ये त्याचे वडिलोपार्जित गाव असून त्या गावाचे नाव अख्तियारपूर आहे. येथे त्याच्याजवळ 125 एकर शेती आहे. येथे आमिर खानचे एक दोन नव्हे तर तब्बल 22 घरं आहेत.  या घरांची किंमत 30 कोटी इतकी सांगितली जाते. 

 

आमिरच्या एका कारची किंमत आहे 10.5 कोटी....
आमिरच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लग्झरी गाड्यांचा समावेश आहे. त्याच्याजवळ BMW 7 सीरिज (1.2 कोटी), रेंज रोवर (1.74 कोटी), बेंटले कांटिनेंटल फ्लाइंग स्पर (3.10 कोटी), रॉल्स रॉयस कूपे (बुलेटप्रूफ) (4.6 कोटी), मर्सिडीज बेंज एस600 Guard (10.50 कोटी) या लग्झरी गाड्या आहेत. मर्सिडीज बेंज एस600 Guard बुलेटप्रूफ आणि बॉम्बप्रूफ कार आहे. 

 

2 कोटींचे आहे आमिरच्या घरचे फर्नीचर...
 आमिरच्या घरी Furlenco (premium furniture) आहे. याची किंमत 2 कोटी इतकी आहे. 

बातम्या आणखी आहेत...